टाटा मोटर्स (Tata motors) लवकरच आपल्या दोन कारचे CNG प्रकार भारतीय बाजारपेठेत लॉंच करणार आहे. कंपनी टाटा टियागो (Tata Tiago)सीएनजी आणि टाटा टिगोर (Tata Tigor) सीएनजी चे मॉडेल आणत आहे. टाटा डीलरशिपवर दोन्ही कारचे बुकिंग सुरू झाले आहे. अलीकडेच, कंपनीने सांगितले की दोन्ही कारचे अधिकृत लॉंचिंग १९ जानेवारी रोजी होईल. सध्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाई या दोनच कंपन्या आहेत, ज्या सीएनजी प्रवासी वाहन विभागात एकमेकांना स्पर्धा देत आहेत. ग्राहक त्यांना ५ हजार ते २० हजार रुपयांमध्ये बुक करू शकतात.

टियागो आणि टिगोरच्या सीएनजी प्रकारांमध्ये कोणतेही मोठे डिझाइन बदल दिसणार नाहीत. नवीन सीएनजी बॅजिंग फक्त त्याच्या टेलगेटवर दिसेल. कंपनीने व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन अद्याप जाहीर केलेले नाही. सध्याच्या व्हेरियंटच्या एंट्री-लेव्हल आणि मिड-लेव्हल व्हेरियंटवर सीएनजी किट दिले जाण्याची अपेक्षा आहे.

66364 crore collection through new 185 schemes of mutual funds
म्युच्युअल फंडांचे नवीन १८५ योजनांद्वारे ६६,३६४ कोटींचे संकलन
infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
Boeing Investment In India
हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?

(हे ही वाचा: अवघ्या ४ लाखांच्या बजेटमध्ये उत्तम बजेट देणाऱ्या ‘या’ आहेत टॉप ३ कार!)

पेट्रोल व्हेरियंटसह इंजिन उपलब्ध असेल

१.२ लिटर , ३ सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन सध्या टियागो आणि टिगोरमध्ये वापरले जाते. जे ८५bhp आणि ११३Nm टॉर्क निर्माण करते. हा इंजिन सेटअप बहुधा सीएनजी प्रकारांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. तथापि, पॉवर आणि टॉर्कमध्ये थोडा फरक असू शकतो. तेच १.२L इंजिन जवळपास ७०-७५bhp पॉवर आणि १००Nm टॉर्क निर्माण करण्याची शक्यता आहे. पेट्रोल प्रकार मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह ऑफर केले जातात, तर सीएनजी प्रकार फक्त ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केले जातील.

(हे ही वाचा: Tiago ते Harrier पर्यंत, टाटा मोटर्स ‘या’ गाड्यांवर देत आहेत बंपर सूट; जाणून घ्या तपशील)

ह्युंदाई ऑरा शी स्पर्धा

पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या तिन्ही प्रकारांमध्ये सादर होणारी टाटा टिगोर ही एकमेव सेडान असेल. सीएनजीवर चालणारी टिगोर ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura )सीएनजीला टक्कर देईल. यासोबतच एमएसआयएल डिझायरची सीएनजी आवृत्तीही लॉन्च करणार आहे. कंपनी टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG) ची स्पर्धा ह्युंदाई सँट्रो सीएनजी (Hyundai Santro CNG) आणि मारुती वॅगन आर सीएनजी (Wagon R CNG) शी होईल.