Tata Nano EV: टाटा नॅनो हे नाव नक्कीच ऐकले असेल, २०१२ या वर्षी कमी किमतीमुळे आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे ही कार चर्चेत आली. टाटा मोटर्स कंपनीने जेव्हा त्यांची नॅनो कार लाँच केली होती तेव्हा ही भारतासह जगभरातली सर्वात स्वस्त कार होती. परंतु ही कार बाजारपेठेत अयशस्वी ठरली. कालांतराने कंपनीला ही कार बंद करावी लागली.  परंतु आता पुन्हा एकदा टाटा नॅनो पुनरागमन करणार असल्याचे ऐकू येत आहे. यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ती इलेक्ट्रिक इंधनावर चालते, ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक कार म्हणून बनवली जात आहे, तिला इतर कोणत्याही इंधनाचा पर्याय मिळणार नाही.

नवीन Tata Nano कशी असेल?

Ratan Tata यांनी सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी Tata Nano भारतीय बाजारात लाँच केली होती. आता Tata Nano चे नवीन लूक पाहिल्यानंतर तुम्हीही त्याच्या प्रेमात पडू शकता, अतिशय नेत्रदीपक रंग आणि उत्कृष्ट डिझाइनसह टाटा नॅनो सर्वांच्या मनावर राज्य करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये इतर कंपन्यांपेक्षा खूप पुढे असलेली टाटा मोटर्स एकामागून एक नवीन मॉडेल्स लाँच करत असून आता नॅनो सर्वांसमोर सादर करण्याची तयारी सुरू आहे. कारमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु आत्ता आम्ही तुम्हाला काही मूलभूत माहिती देणार आहोत. त्यात जवळपास सर्व वाहनांकडे असलेल्या गोष्टी असतील.

(हे ही वाचा : प्रतीक्षा संपली! Tiago, Citroen चा खेळ संपणार, ‘या’ दिवशी येतेय देशातील सर्वात छोटी अन् स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत…)

५ सीटर टाटा नॅनोमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला सपोर्ट करण्यात आला आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग पूर्वीपेक्षा सोपे होऊ शकते. बाकीच्या गाड्यांप्रमाणे, यात पॉवर विंडो फ्रंट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि पॉवर स्टीयरिंग देखील दिसेल. सुरक्षेसाठी, प्रवासी तसेच ड्रायव्हरच्या एअर बॅग दिल्या जात आहेत, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅनोचे हे नवीन मॉडेल ४ सीटर कार म्हणून विकसित केले जात आहे, तर पूर्वी ५ सीट उपलब्ध होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत किती असेल?

टच स्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्लेसह, तुम्ही नॅनोमध्ये रिअल टाइम लोकेशन, जीपीएस नेव्हिगेशन, संगीत आणि स्वयंचलित हवामान नियंत्रण यासारख्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असाल. किंमतीबद्दल, असा अंदाज आहे की नॅनोची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत १० ते १२ लाख रुपये असू शकते, कारबाबत सविस्तर माहितीही लवकरच समोर येऊ शकते