Tata Punch EV Discount: एकीकडे, भारतीय कार बाजारात, कारच्या किमती वाढत आहेत, तर दुसरीकडे, विक्री वाढवण्यासाठी कारवर सवलत देण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. मारुती सुझुकीपासून ते टाटा मोटर्सपर्यंतच्या गाड्यांवर खूप चांगल्या सवलती आहेत. आता अशा परिस्थितीत, जर तुम्ही या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली ठरू शकते. टाटाने फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक कार पंच EVवर ७०,००० रुपयांपर्यंत सूट दिली आहे. या कारची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊया…

अशा प्रकारे मिळेल सवलतीचा फायदा

टाटा मोटर्स पंच ईव्हीच्या MY2024 मॉडेलवर जास्तीत जास्त ७०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे तर MY2025 मॉडेलवर ४०,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. सवलतीबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात. ऑटोकार इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार या सवलतीची माहिती देण्यात आली आहे.

किंमत आणि फिचर्स

टाटा पंच ईव्हीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी ९.९९ लाख रुपयांपासून १४.२९ लाख रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये २ बॅटरी पॅक दिले गेले आहेत, ज्याची रेंज ३१५ किलोमीटर आणि ४२१ किलोमीटरपर्यंत आहे. रोजच्या वापरासाठी ही एक चांगली एसयूव्ही आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फीचर्सबदद्ल सांगायचं झालं तर यात १०.२५ इंच टचसक्रिन इन्फोटनमेंट सिस्टिम, एअर प्युरीफायर आणि सनरूफदेखील दिलं गेलं आहे. सेफ्टिसाठी कारमध्ये ६ एअरबॅग इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि ३६० डिग्री कॅमेरासारखे फिचर्स आहेत. टाटा पंच EVची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपयांपासून ते टॉप मॉडेलसाठी १४.२९ लाख रुपयांपर्यंत जाते.