गेल्या अनेक दशकांपासून वाहनांमध्ये बसवलेल्या एअरबॅग्समुळे जगातील अनेक ड्रायव्हर आणि प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. सीट बेल्टनंतर, ऑटोमोबाईल सुरक्षिततेच्या दृष्टीने एअरबॅग्ज सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. परंतु प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर देशातील कार स्वारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यानंतर सरकारने कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याची मुदतही निश्चित केली आहे. केवळ सहा एअरबॅग अनिवार्य केल्याने कारमध्ये प्रवास करणे सुरक्षित होईल काय, आता असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सहा एअरबॅग अनिवार्य
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ट्विट केले की, प्रवासी कारमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून तयार होणाऱ्या सर्व कारमध्ये सहा एअरबॅग देणे आता बंधनकारक होणार आहे.

आणखी वाचा : वाहनातून निघणाऱ्या काळ्या धुराच्या समस्येला गांभीर्याने घ्या, ‘हे’ करा, अन्यथा होईल मोठे नुकसान

असे होऊ शकते नुकसान
अपघाताच्या वेळी कारमधील एअरबॅग्स सीटबेल्ट ऑन असतानाच जास्त प्रभावी ठरतात. सीटबेल्ट न लावल्यास आणि अपघात झाल्यास एअरबॅगचेही नुकसान होऊ शकते. इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या मते, भारतातील ८५ टक्के लोक मागच्या सीटवर सीट बेल्ट घालू लागणार तेव्हा सहा एअरबॅग अनिवार्य करण्याची तरतूद पुढे नेली पाहिजे.

IRF एमेरिटसचे अध्यक्ष केके कपिला म्हणाले…

IRF एमेरिटसचे अध्यक्ष केके कपिला म्हणाले की, जोपर्यंत लोक मागच्या सीटवर बेल्ट घालायला सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत सरकारने लोकांना जागरूक केले पाहिजे. अन्यथा, सहा एअरबॅग्जची तरतूद उलटवली जाईल, ज्यामुळे अधिक जीवघेणे अपघात होतील. क्रॅशमध्ये, सीट बेल्ट हे प्राथमिक संयम ठेवणारे साधन असते तर एअरबॅग्स पूरक आधार देतात. अनेक जागतिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर सीट बेल्ट न लावता एअरबॅग लावली गेली तर त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते आणि मृत्यू देखील होऊ शकतो. संघटनेने विनंती केली. IRF ने त्यांना विनंती केली आहे की ही तरतूद कालबद्ध नसावी परंतु एका सर्वेक्षणाद्वारे नियंत्रित केली जावी, जे दर्शविते की किती लोक मागील सीट बेल्ट घालतात.

“MORTH डेटानुसार, ७० टक्के दुचाकी अपघात मृत्यूंमध्ये, पीडितांनी हेल्मेट घातलेले नाही आणि कार अपघातातील ८७ टक्के मृत्यूंमध्ये, पीडितांनी सीट बेल्ट लावल्याचे आढळले नाही. दुर्दैवाने, ९६ कार प्रवासी मागील सीटवर सीट बेल्ट लावत नाहीत.