तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. किया कंपनी पुन्हा एकदा आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने ‘किया कॅरेन्स’च्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच याच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात, अशी माहिती आहे.

कियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये आपली सात सीटर एमपीव्ही कॅरेन्स सादर केली. तेव्हापासून या एमपीव्हीला भारतीय ग्राहकांनी खूप पसंती दिली आहे. कंपनीने कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ८.९९ लाख रुपये ठेवली होती. लाँच झाल्यानंतर कंपनीने वाहकांच्या किमतीत एकदाच वाढ केली आहे. एप्रिल महिन्यात त्याची किंमत ७० हजार रुपयांनी वाढली होती. त्यानंतर त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९.५९ लाख रुपये होती.

आताच्या किंमती

कॅरेन्सचे मूळ प्रकार प्रीमियम आहे ज्याची एक्स-शोरूम किंमत ९.५९ लाख रुपये आहे. त्यानंतर प्रेस्टीज व्हेरिएंट आहे ज्याची एक्स-शोरूम किंमत रु. १०.६९ लाख आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रेस्टिज प्लस प्रकार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत १३.९० लाख रुपये आहे.

आणखी वाचा : आता टेस्लाला टक्कर देणार टोयोटाची ‘ही’ नवीन कार; एका चार्जवर मिळेल 599km ची जबरदस्त रेंज; जाणून घ्या कशी आहे ही कार…

इंजिन पर्याय आणि मायलेज 

किया कॅरेन्समध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यात पहिल्या पर्यायात १.५ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे सहा-स्पीड मॅन्युअलसह येते. तर दुसऱ्या पर्यायात १.४ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे १४० एपी आणि २४२ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल आणि पेडल शिफ्ट सात-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. तसेच याच्या तिसऱ्या इंजिन पर्यायात १.५ लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे ११५ एचपी आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. या कारबद्दल माहिती देताना कंपनीने दावा केला आहे की, ही कार २१.३ kmpl मायलेज देते.   

फीचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीने या नवीन किया कॅरेन्समध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. ज्यात टॉप-एंड व्हेरियंटमध्ये व्हेंटीलेटस सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १०.२५-इंच टचस्क्रीन, रियर व्ह्यू कॅमेरा, टच क्लायमेट कंट्रोल, एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच दुसऱ्या रांगेसाठी इलेक्ट्रिक वन टच टंबल डाउन, ए. स्टँडर्ड सनरूफ, कूल्ड कप होल्डर, रिट्रॅक्टेबल सनशेड, रिट्रॅक्टेबल टेबल, सहा एअरबॅग्ज स्टँडर्ड आणि दमदार बोस ऑडिओ सिस्टीम सारखे फीचर्स दिले आहेत. ग्राहक ही कार सात सीटर आणि सहा सीटर अशा दोन पर्यायात खरेदी करू शकतात.