किया कॅरेन्सचे MPV ही मारुती सुझुकी XL6, महिंद्रा मराझो, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि ह्युंदाई अल्काझार यांच्याशी स्पर्धा करेल. MPV भारतात उत्पादित केले जाईल आणि ९० जागतिक बाजारपेठांमध्ये पाठवले जाईल, ज्यामध्ये राइट हँड आणि लेफ्ट हँड ड्राइव्ह मार्केटचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किया कॅरेन्सचे MPV एकूण ८ कलर पर्यायांसह येईल ज्यात इम्पीरियल ब्लू, मॉस ब्राउन, स्पार्कलिंग सिल्व्हर, इंटेन्स रेड, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि क्लियर व्हाईट यांचा समावेश आहे. किया दावा करते की कॅरेन्स अनेक फर्स्ट-इन-क्लास फीचर्स ऑफर करते. MPV हे डिझाईनसह येते जे भारतात उपलब्ध असलेल्या अन्य किया कारपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

(हे ही वाचा: KIA च्या नवीन कार ‘Carens’ MPV चे बुकिंग ‘या’ तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या फीचर्स)

१४ जानेवारीला सुरु झाली होती बुकिंग

ऑटोमेकर किया इंडियाने सोमवारी सांगितले की, ऑर्डर प्रक्रिया सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या आगामी मॉडेल कॅरेन्सचे ७,७३८ बुकिंग मिळाले आहेत. कंपनीने नवीन मॉडेलसाठी १४ जानेवारी रोजी २५,००० रुपयांच्या प्रारंभिक बुकिंग रकमेवर प्री-बुकिंग सुरू केली होती.

(हे ही वाचा: मारुती सुझुकीची वाहने महागली, ४.३% टक्क्यांपर्यंत वाढल्या किमती)

(फोटो:PR)

(हे ही वाचा: लोकसत्ता विश्लेषण: सर्व कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य! जाणून घ्या काय आहे या घोषणेचा अर्थ आणि किमतीवर होणारा परिणाम)

“केरेन्सला प्री-बुकिंग सुरू केल्याच्या पहिल्या २४ तासांत ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला आहे. किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ टी-जिन पार्क यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “भारतातील आमच्या कोणत्याही उत्पादनांसाठी आम्हाला मिळालेले हे पहिल्या दिवसातील सर्वोच्च बुकिंग आहे.”

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This car got 7738 bookings on the same day there is huge demand in india ttg
First published on: 17-01-2022 at 17:11 IST