Toyota CNG Cars: दिग्गज कार उत्पादक कंपनी टोयोटाने आता सीएनजी सेगमेंटमध्ये आपली नवीन कार सादर केली आहे. कंपनीने आपली पहिली सीएनजी कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. कंपनीने सीएनजी अवतारात Glanza लाँच केले आहे. या प्रीमियम हॅचबॅकचे सीएनजी मॉडेल दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आले आहे. Glanza CNG लाँच केल्यामुळे कंपनीने त्यासाठी बुकिंगही सुरू केले आहे. हे मारुती बलेनोच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ते बलेनोला स्पर्धा देऊ शकते.

या कारची खास वैशिष्टये

Glanza CNG त्याच्या सध्याच्या इंधन कार्यक्षम K-सिरीज इंजिनमध्ये लाँच करण्यात आली आहे. हे ११९७ सीसी इंजिन आहे. जे ७७.५ PS ची पॉवर जनरेट करते. हे इंजिन उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी देखील ओळखले जाते. मारुती सुझुकी हेच इंजिन बलेनोमध्ये वापरत आहे. टोयोटाने दावा केला आहे की, ग्लान्झा १ किलो सीएनजीवर ३०.६१ किमी मायलेज देऊ शकते. सीएनजी वाहनांच्या घोषणेसह, कंपनीने या क्षेत्रातील दिग्गज मारुती सुझुकी आणि ह्युंदाईला आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. टोयोटाने या वर्षाच्या सुरुवातीला ग्लान्झा फेसलिफ्ट लाँच केली होती.

आणखी वाचा : Skoda भारतात सादर करणार नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार; फीचर्स पाहून व्हाल दंग!

Glanza च्या नवीन CNG व्हेरियंटमध्ये LED प्रोजेक्ट हेडलॅम्प्स, ट्विन LED डेटाइम रनिंग लॅम्प्स, रुंद ट्रॅपेझॉइडल लोअर ग्रिल, स्लीक आणि डायनॅमिक R17 अलॉय व्हील, LED टेल लॅम्प्स आहेत. यात टोयोटाची सिग्नेचर फ्रंट फॅसिआ आणि प्रगत तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय यामध्ये इतर कोणतेही कॉस्मेटिक बदल करण्यात आलेले नाहीत. हे त्याच्या सामान्य मॉडेलसारखेच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत
टोयोटाने ग्लान्झा सीएनजीच्या किमतीही जाहीर केल्या आहेत. Glanza S CNG ची किंमत ८.४३ लाख रुपये आहे तर Glanza G CNG ची किंमत ९.४६ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आधारावर लागू आहेत. कंपनीने आपल्या सर्व अधिकृत डीलरशिपवर दोन्ही CNG मॉडेल्सची बुकिंग सुरु केली आहे.