देशातील इलेक्ट्रिक वाहनांची झपाट्याने वाढणारी मागणी लक्षात घेता, ऑटोमेकर्स केवळ त्यांची स्वतःची इलेक्ट्रिक वाहनेच लॉन्च करत नाहीत तर बाजारात उपलब्ध वाहनांना टक्कर देण्यासाठी अधिक रेंज आणि फिचर्ससह इलेक्ट्रिक वाहने देखील तयार करत आहेत.

इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणारी कंपनी Trove Motors लवकरच भारताच्या स्थानिक बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Trove H2 (TROUVE H2) लॉन्च करणार आहे.

लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर रिलीज केला आहे, यामध्ये या स्कूटरचे वर्णन हायपर मॅक्सी स्कूटर असे केले जात आहे. कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरचे काही डिटेल्स समोर आले आहेत, ज्यामध्ये त्याच्या चाकाचा आकार दिसत आहे जो सामान्य स्कूटरमध्ये येणाऱ्या टायरपेक्षा मोठा आहे.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूटर पूर्णपणे मेड इन इंडिया आहे जी कंपनीच्या बेंगळुरू येथील आर अँड डी सेंटरमध्ये तयार केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू होईल, त्यानंतर जानेवारी २०२३ पासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल.

आणखी वाचा : Maruti Ertiga LXI Finance Plan: मारुती एर्टिगा ७ सीटर विकत घ्यायचीय या MPV चे फायनान्स प्लॅन जाणून घ्या

स्कूटरच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास, रिपोर्टनुसार, ४.८ kW ची मोटर लिथियम-आयन बॅटरी पॅकसह जोडली जाईल. ही इलेक्ट्रिक मोटर ७.९ किलोवॅटची पीक पॉवर जनरेट करेल.

स्कूटरच्या रेंजबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर २३० किमीची रेंज देईल. स्कूटरच्या स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्टनुसार, ही स्कूटर फक्त ४.३ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग गाठू शकते.

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये, कंपनी त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देणार आहे, ज्यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम दिली जाईल.

स्कूटरच्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, ट्रोव्ह मोटर्सला मोठा डिजिटल डिस्प्ले, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, जिओ फेन्सिंग, 4G इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन यांसारखे अनेक फीचर्स दिले जातील.

एकदा भारतात लॉन्च झाल्यानंतर, ही स्कूटर सिंपल वन, एथर 450X, ओला एस1 प्रो यांसारख्या लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी तगडी टक्कर करेल याची खात्री आहे.