Old Car care tips: बऱ्याचदा आपल्या अनेक वस्तू कधीही खराब, जुन्या झाल्या तरीही अनेक जण त्याच वापरणं पसंत करतात. अनेकदा ही गोष्ट आपल्या आवडीच्या वाहनाबरोबरही होते. जर तुमच्याकडेही जुनी कार असेल आणि तुम्ही ती बदलण्याचा विचार करत नसाल तर तुम्हाला तुमच्या जुन्या कारची काळजी कशी घ्यावी हे माहीत असले पाहिजे, जेणेकरून पुढील अनेक वर्ष तुम्ही ती योग्यप्रकारे वापरू शकता.

तुम्हाला जर तुमच्या जुन्या कारमधून जास्त मायलेज मिळवायचे असेल आणि तिला अनेक वर्ष चालवायचं असेल, तर तुम्ही नियमित वाहन देखभालीबाबत लक्ष द्यायला पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास महागडी दुरुस्ती, बिघाड किंवा अपघातही होऊ शकतात.

जुनी कार अशाप्रकारे वर्षानुवर्षे चालवा

  • ब्रेकिंग सिस्टीम तपासा

कारची ब्रेकिंग सिस्टीम ही सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक यंत्रणा आहे. नवीन कारसह जुन्या कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ब्रेकिंग सिस्टीम तपासणे महत्त्वाचे आहे. ब्रेक पॅड झिजलेले नाहीत आणि ब्रेक फ्लुइड संपत नाही याची खात्री करण्यासाठी ब्रेक तपासा.

  • कारचे टायर नियमितपणे तपासा

कारच्या टायरकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. तुमच्या कारचे टायर नियमितपणे बदला आणि हवेचा दाब तपासण्यासाठी नेहमी टायर गेज तुमच्यासोबत ठेवा. जर तुम्ही टायर बदलत असाल तर तुम्ही तो एखाद्या चांगल्या दर्जाच्या कंपनीकडून खरेदी केल्याची खात्री करा. स्थानिक दुकानातून स्वस्त टायर खरेदी करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका.

  • स्टीयरिंग सिस्टमची काळजी

स्टीयरिंग सिस्टमच्या समस्यांमुळे कारच्या गतिशीलतेमध्ये अडथळा येऊ शकतो. यामुळे टायर्सवरदेखील दबाव येऊ शकतो. स्टीयरिंग फ्लुइड वेळेवर बदलल्याचे नेहमी सुनिश्चित करा.

  • विंडशील्ड वायपर्सची काळजी घ्या

विंडशील्ड वायपर ड्रायव्हरसाठी खूप महत्त्वाचे आहे. कार चालवताना स्पष्टपणे न दिसणे हे अनेक अपघातांचे कारण आहे. म्हणून वायपर ब्लेड काळजीपूर्वक तपासा आणि आवश्यक असल्यास ते बदला.

हेही वाचा: CNG चे कारचालक आहात? ‘या’ महत्त्वाच्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या कारची काळजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • इंधन लाईन्स तपासा

जुन्या गाड्यांवरील इंधन लाईन्स अनेकदा तुटतात, ज्यामुळे इंधन गळती होते; याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण ते आगीचा धोका निर्माण करू शकतात.