scorecardresearch

Best Speed for Car Mileage: Petrol Cars कोणत्या स्पीडने बेस्ट मायलेज देतात? जाणून घ्या

Car Driving Tips: चांगलं मायलेज मिळवण्यासाठी कारचा वेग खूप महत्त्वाचा असतो. चला तर जाणून घेऊया Petrol Cars कोणत्या स्पीडने बेस्ट मायलेज देतात..?

Best speed for Car mileage
पेट्रोल कार कोणत्या वेगाने सर्वोत्तम मायलेज देतात? (Photo-Pixabay)

Best speed for Car mileage: इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. कार चालवताना वेग आणि मायलेज हे दोन महत्त्वाचे घटक प्रत्येकाच्या मनात येतात. चांगलं मायलेज मिळवण्यासाठी कारचा वेग खूप महत्त्वाचा असतो. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की, कमी वेगाने कार चालवल्याने चांगले मायलेज मिळते, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. चांगल्या मायलेजची युक्ती म्हणजे गाडी चालवताना योग्य गती आणि गियर राखणे. दुसरीकडे, जास्त वेगाने गाडी चालवणे देखील मायलेजसाठी धोकादायक ठरू शकते. जास्त वेगाने गाडी चालवताना इंधनाचा वापर वाढतो आणि त्यामुळे कारचे मायलेज झपाट्याने कमी होते. किती वेगाने वाहन चालवून तुम्ही चांगले मायलेज मिळवू शकता, चला तर जाणून घेऊया…

चांगलं मायलेज मिळवण्यासाठी कारचा वेग खूप महत्त्वाचा

चांगलं मायलेज मिळवण्यासाठी कारचा वेग खूप महत्त्वाचा असतो. कार मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवत असाल तर जास्त पेट्रोल वापरू लागते. किंवा कार खूप धिम्या गतीने चालवत असाल तरी जास्त पेट्रोल खर्च होतं. त्यामुळे कार एका ठराविक आणि मर्यादित वेगाने चालवत राहा. जास्त पॉवर जनरेट करण्यासाठी जास्त पेट्रोल खर्च होतं. तर कार धिमी चालवल्याने देखील इंजिनवरचं प्रेशर वाढून अधिक पेट्रोलचा खप होतो. म्हणून अनेक तज्ज्ञ असं सांगतात की, कारचा वेग ५० ते ८० किमी प्रतितास दरम्यान असावा.

कोणत्या स्पीडने कार चालवल्यास योग्य मायलेज मिळेल?

ऑटो तज्ज्ञांच्या मते, कारसाठी सर्वोत्तम मायलेज ७०-१०० किमी प्रतितास वेगाने मिळते. या दरम्यान, कार टॉप गियरमध्ये असणे आवश्यक आहे. मात्र, या वेगाने वाहन चालवणे महामार्गांवरच शक्य आहे. याशिवाय, तुम्ही वाहन कोणत्याही गिअरमध्ये चालवा, गाडीचा RPM १५०० ते २००० च्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, चांगला मायलेज राखण्यासाठी कार योग्य गिअरमध्ये चालवणे महत्त्वाचे आहे. शहरात सावकाश वाहन चालवल्यामुळे मायलेज कमी होते. कोणत्या गिअरमध्ये गाडी कोणत्या वेगाने चालवायची ते जाणून घ्या-

पहिला गिअर- ० ते २० किमी.
दुसरा गिअर – २० ते ३० किमी.
तिसरा गिअर – ३० ते ५० किमी.
चौथा गिअर – ५० ते ७० किमी.
पाचवा गिअर – ७० पेक्षा जास्त वेग
जर सहावा गिअर असेल तर तुम्ही १०० किमीसाठी, वापरले जाऊ शकते…

अनेक लोक विचार करतात की, स्पीड कमी केल्यावर मायलेज कसं कमी करता येईल, जर तुम्ही कमी स्पीडमध्ये हाय गिअरमध्ये कार चालवली तर ते इंजिनवर भार टाकेल, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढेल. दुसरीकडे, कमी गीअर्समध्ये सतत मंद वाहन चालवण्यामुळे जास्तीत जास्त इंधनाचा वापर होतो आणि त्यामुळे मायलेज कमी होते.

(टीप: कारचे मायलेज टायरचा दाब, ड्रायव्हिंगची शैली आणि कारची कार्यक्षमता यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते)

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 12:26 IST

संबंधित बातम्या