scorecardresearch

कार, बसमधून प्रवास करताना उलट्या का होतात माहितेय का? ‘हे’ आहे यामागील खरं कारण

Reason of Motion Sickness: प्रवासात उलट्या होणं, ही काही लोकांसाठी मोठी समस्या असते. पण तुम्हाला माहितेय का, कार, बसमधून प्रवास करताना उलट्या का होतात, चला तर जाणून घेऊया यामागील खरं कारण…

Reason of Motion Sickness
कार, बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना उलट्या का होतात? (Photo-freepik)

Reason of Motion Sickness: अनेकांना लांबचा प्रवास करायला फार आवडते. पण नेहमीच अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात. मग अशा परिस्थितीत प्रवासाची सगळी मजाच खराब होऊन जाते. या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठंही जायला आवडत नाही. वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत. यात लहान मोठा असा फरक नसतो. पण प्रवास दरम्यानच उलटी का होत असावी? चला तर आज जाणून घेऊयात या मागचं वैज्ञानिक कारण.

मोशन सिकनेस म्हणजे काय?

मोशन सिकनेस हा प्रवास करतांना अचानक वाटणारी मळमळ किंवा उलट्या होणे होय. लहान मुले ,गर्भवती महिला, आणि काही विशिष्ट औषध घेणारे लोकांनां हे होऊ शकते. जेव्हा डोळ्यांच्या, कानाच्या, स्नायूंच्या आणि सांध्यांच्या मज्जातंतू कडून पाठवले जाणारे हालचालींचा सिग्नल मेंदूच्या सिग्नल सोबत जुळत नाही तेव्हा सेन्सेशन जाणवते. मोशन सिकनेसमुळे लोकांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखे वाटते. जेव्हा तुम्ही डोंगराळ भागात प्रवास करता तेव्हा हे अधिक घडते. चला तर मग जाणून घेऊया याचे कारण काय आहे?

(हे ही वाचा : खरचं कार जास्त Wash केल्याने कारच्या पेंटचे नुकसान होते का? जाणून घ्या सविस्तर )

कारमध्ये उलट्या का होतात?

मोशन सिकनेस हा आजार नसून ती मनाची अवस्था आहे. जेव्हा मेंदूला कान, डोळे, स्नायू आणि सांध्या सारख्या  ज्ञानेंद्रियांकडून विजोड सिग्नल मिळतात तेव्हा मोशन सिकनेस चे लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत आपले शरीर हालचाल करत आहे की विश्रांती घेत आहे हे आपल्या मनाला समजत नाही. अशा परिस्थितीत मध्यवर्ती मज्जासंस्था गोंधळून जाते आणि पोटात अस्वस्थता सुरू होते. याला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमुळे तीव्र डोकेदुखी आणि जास्त घाम येतो. खूप लवकर चक्कर येते.

५ ते १२ वयोगटातील वृद्ध, गर्भवती महिला आणि मुलांमध्ये मोशन सिकनेस सामान्यतः सामान्य आहे. मायग्रेनची समस्या असलेल्या लोकांमध्ये देखील हे सामान्य आहे. हे अनुवांशिक देखील असू शकते. वाहन थांबले आणि उतरले की ही समस्या दूर होते.

प्रवासात ‘या’ महत्त्वाच्या टिप्स फाॅलो करा

  • प्रवासाच्या आधी किंवा प्रवासात जास्त अन्न खाऊ नका.
  • कारमधून प्रवास सुरू करण्याच्या एक तास आधी मोशन सिकनेसचं औषध घ्या. 
  • कारमध्ये बसल्यावर एसीऐवजी खिडकी उघडी ठेवून ताजी हवा घ्या.
  • लिंबू, कोल्ड्रिंक, आले किंवा पुदिन्याचे सेवन करू शकता.
  • मागच्या सीटवर बसणे टाळा.

(टीप: वरिल माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 14:08 IST

संबंधित बातम्या