Hero MotoCorp : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्प कंपनी भारतात लवकरच आपली नवीन ‘XPulse 200T 4V’ लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या नवीन बाईकचा टिझर जारी केला आहे. ही मोटरसायकल आता उत्तम स्टाइलिंग आणि अपडेटेड फीचर्ससह येईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया..

कशी असेल नवी बाईक?
या बाईकचे फोटो आधीच लीक झाले आहेत. एका अहवालानुसार, 2022 XPulse 200T ला बॉडी-रंगीत फ्लाय स्क्रीन, स्लोपिंग फ्युएल टँक, नवीन बेली पॅन, ट्यूब-टाइप पिलियन ग्रॅब रेलसह सिंगल-पीस सीट, गार्टर्ससह फ्रंट फोर्क आणि साइड-माउंट एक्झॉस्ट देखील मिळेल.

याशिवाय, ही बाईक ब्लूटूथ-सक्षम डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप आणि अलॉय व्हीलसह देखील येईल. काही रिपोर्ट्सनुसार, यामध्ये १३-लीटरची इंधन टाकी देखील आढळू शकते. त्याच वेळी, त्याचे वजन सुमारे १५४ किलो असू शकते. या बाईकमध्ये फोर्क कव्हर गेटर्स, हेडलॅम्पवर नवीन व्हिझर, नवीन पेंट स्कीम आणि बरेच काही मिळू शकते.

आणखी वाचा : SUV कारच्या सर्वाधिक विक्रीत ‘ही’ कार अव्वल; जाणून घ्या वैशिष्ट्ये

हिरोच्या नवीन XPulse 200T 4V मध्ये १९९. सीसी, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड, ४-स्ट्रोक, ४-व्हॉल्व्ह इंजिन दिले जाऊ शकते. ही बाईक १८.९ Bhp आणि १७.३५ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असले. जी ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. या बाईकमध्ये ग्राहकांना  XPulse 200T 4V ला ब्लूटूथ-आधारित डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नेव्हिगेशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स मिळू शकतात. असे असलं तरी या बाईकच्या हार्डवेअर बिट्समध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी शक्यता आहे.

किंमत
भारतीय बाजारपेठेत ही बाईक लाँच केल्यानंतर बजाज पल्सर NS200 शी स्पर्धा करेल.या नवीन बाईकची किंमत कंपनी १.२४ लाख रुपये ठेवू शकते, अशी शक्यता आहे.