-स्नेहल बाकरे

यंदाची रंगपंचमी कशी साजरी करायची यासाठी सोसायटीतल्या खास बालमंडळाची सोसायटीतल्या बागेच्या एका कोपऱ्यात सभा भरली आहे. अथर्व, तन्मय, वेदिका, निहारिका आणि जुई सगळे मिळून एक एक करत अगदी मोठ्या उत्साहाने नवनवीन कल्पना मांडत आहेत.

वेदिका त्यांच्यात जरा वयानं मोठी असल्यानं अगदी हक्कानं आपलं म्हणणं मांडतेय. ‘‘यावेळी आपण काहीतरी वेगळं करूयात. ते रासायनिक रंग तर अजिबातच नकोत. गेल्या वर्षी बाजूच्या सोसायटीत राहणाऱ्या बंटीनं कुठून तरी भलताच सोनेरी रंग आणला होता. कितीही चोळून चोळून काढायचा प्रयत्न केला तरी लवकर जातच नव्हता.’’

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा

निहारिका तिला दुजोरा देत म्हणाली, ‘‘हो ना, त्यानं माझीही त्वचा खूपच खरखरीत झाली होती. आईचाही खूप ओरडा खाल्ला होता मी मागच्या वेळी.’’

तन्मय म्हणाला, ‘‘यावेळी आपण फक्त नैसर्गिक रंगांनीच रंगपंचमी खेळूयात.’’

हेही वाचा…बालमैफल : चेरीचॉकोचा साहसी प्रवास

त्यावर वेदिका म्हणाली, ‘‘माझ्याकडे अजून एक भन्नाट कल्पना आहे. आपण नैसर्गिक रंग घरीच बनवूयात का?’’

‘‘ते कसं काय?’’ कुतूहलानं जुईनं विचारलं.

‘‘एकदम सोप्पं आहे. बीट किसून पाण्यात टाकायचं की झाला लाल रंग, हळद पाण्यात टाकली झाला पिवळा रंग, अशाच रंगीबेरंगी भाज्यांपासून आपण नैसर्गिक रंग घरीच बनवू शकतो.’’

‘‘घरगुती नैसर्गिक रंगांनी आपल्याला कसलाही त्रास होणार नाही. पण मला सांगा, एवढे सगळे रंग बनवायचे म्हणजे किती तरी बादल्या पाणी वाया जाणार.’’ अथर्वनं महत्त्वाचा मुद्दा मांडला.

हेही वाचा…बालमैफल : कासवाची हुशारी

निरागसपणे जुई म्हणाली, ‘‘अरे, पण रंगपंचमी ही रंग आणि पाणी यांनीच तर खेळतात ना. मी तर बाबांना आधीच सांगून ठेवलंय, यावेळी मला मोठी पिचकारी हवी आहे. म्हणजे मी एका दमात तुम्हा सगळ्यांना भिजवून टाकेन.’’

‘‘इतकी वर्षे आपण पाण्यानं रंगपंचमी खेळत आलो. पण यावर्षी आपण नवीन प्रकारे रंगपंचमी साजरी करून बघूया का?’’ अथर्वच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती.

रंगपंचमी पाण्यानं खेळायची नाही हे ऐकून अगदी हताश होऊन जुई म्हणाली, ‘‘पाणी न वापरता रंगपंचमी खेळायची म्हणजे नक्की काय करायचं?’’

‘‘अगं, गेल्या आठवड्यात माझे बाबा मला सांगत होते की यावर्षी धरणांमध्ये फक्त पन्नास टक्केच पाणी उरलंय. आता पाण्याची टंचाई होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पाणी जपून वापरायला हवं. काही दुष्काळी भागात तर प्यायलादेखील पाणी नाहीये. आणि एवढी गंभीर परिस्थिती असताना आपण हे असं पाणी वाया घालवायचं बरोबर नाही ना.’’ अथर्व तिला समजून सांगता होता.

‘‘बरोबर आहे तुझं, पण मग यासाठी आपण काय करू शकतो?’’ तन्मयचा प्रश्न.

हेही वाचा…सुखाचे हॅश टॅग : मनाची परीक्षा

अथर्व म्हणाला, ‘‘हे बघा, थेंबे थेंबे तळे साचे. आपण थोडं का होईना, पण पाणी वाचवू शकतोच ना. रंगपंचमीला आपण एकमेकांवर रंग उडवण्यापेक्षा मस्तपैकी रंगीबेरंगी चित्रे रंगवून त्यांचे ग्रीटिंग कार्ड एकमेकांना देऊयात का?’’

निहारिका म्हणाली, ‘‘चालेल, तसंही मला चित्र रंगवायला खूपच आवडतं.’’

तन्मय म्हणाला, ‘‘जपानमध्ये सुकलेल्या पानाफुलांपासून मस्त नक्षीदार चित्रं तयार करतात. त्याला ‘ओशिबाना’ असं म्हणतात. गेल्या महिन्यात आमच्या शाळेत गोडबोले बाईंनी आम्हाला शिकवलं ते. आपणही अशी रंगीबेरंगी पानाफुलांची नक्षी बनवूयात. त्यानं कागदही वाया जाणार नाही. आपण टाकाऊपासून टिकाऊ या पद्धतीनं ते बनवू शकतो.’’

अथर्व म्हणाला, ‘‘हे तर करूयातच. पण आपण अजून एक गोष्ट करू शकतो. ज्याच्यानं पाणी तर वाया जाणारच नाही, उलट पुढे जाऊन पाणी वाढायला मदत होईल.’’ उतावळ्या वेदिकाला न राहावल्यामुळे ती म्हणाली, ‘‘अथर्व, असं कोड्यात नको बोलूस. नक्की काय करायचे ते सांग बघू पटकन.’’

हेही वाचा…बालमैफल : नीट कान देऊन ऐक!

‘‘अगं, रंगपंचमीला वेगवेगळ्या रंगांचं जास्त महत्त्व असतं ना. मग आपण त्या कोपऱ्यावर जी एक छोटीशी नर्सरी आहे ना तिथून अशीच रंगीबेरंगी फुला-पानांची काही रोपं विकत घेऊयात. आई-बाबा आपल्याला जे बाजारातून रंग विकत घेण्यासाठी पैसे देणार आहेत ना, तेच पैसे आपण ही रोपं विकत घेण्यासाठी वापरूयात आणि ही रोपं आपल्या बागेत लावूयात. म्हणजे फक्त एकच दिवस नाही तर अगदी कायमस्वरूपी आपली बाग रंगीबेरंगी फुलांनी सजलेली दिसेल. आपण शाळेतून येताना आपल्या पाण्याच्या बाटलीमध्ये जे उरलेलं पाणी असतं ना, ते रोज येताना या झाडांना घालत जाऊयात. त्यामुळे बाटलीतलं पाणीही वाया जाणार नाही आणि झाडंपण टवटवीत राहतील.’’

‘‘काही वर्षांपूर्वी जंगलं नष्ट केल्यामुळे आज पाणीटंचाई निर्माण झालीये आणि आता आपण झाडं लावून ही टंचाई कमी करण्यात खारीचा वाटा उचलूयात.’’ – इती वेदिका

हेही वाचा…बालमैफल : मांजरीचं प्रेम..

शेजारच्या बाकड्यावर बसलेल्या एका आजोबांच्या कानावर मुलांचं बोलणं पडत असतं. ते मुलांजवळ येऊन म्हणाली, ‘‘अरे मुलांनो, किती छान कल्पना सुचवली आहे तुम्हाला. तुमच्यासारख्या मुलांनी जर आपल्या पर्यावरणाचा असा विचार केला तर नक्कीच पुढे जाऊन काही प्रमाणात का होईना पण त्याची हानी होणार नाही. यावर्षी फक्त तुम्ही मुलंच नाही तर सोसायटीतले आम्ही सर्व मोठी मंडळीही तुमच्यासोबत अशी रंगीबेरंगी फुलापानांची झाडे लावून रंगपंचमी साजरी करू. पण तुम्ही घ्याल ना आम्हाला तुमच्या टीममध्ये?’’

सगळी मुलं आनंदात ‘‘हो’’ म्हणत एकमेकांना टाळ्या देऊ लागली.

bakresnehal@gmail.com