ओम ठोंबरे

सर्वाप्रमाणेच आपल्याही घरी गणपती असावा असं मला खूप वाटायचं. घरातील गणेशमूर्ती पाहून कल्पना सुचली की, या वर्षी आपणच घरी गणपती तयार करायचा. शाळेतील प्रोजेक्टसाठी आणलेली रंगीबेरंनी क्ले घेऊन मी सुरुवात केली. गणपतीचं आसन फारच सोपं. हळूहळू पिवळे पितांबर नेसलेले पायही छान जमले. गणपतीचे पोट तसं सोपं, पण माझ्याकडे खूप कमी माती होती. मग खेळण्यातली गोटी घेऊन त्याभोवती माती लावून मस्त गरगरीत पोट तयार झालं. मला खरी भीती वाटत होती की आपल्याला गणपतीचा चेहरा जमेल का? पण मी काम सुरूच ठेवलं.

Puneri pati puneri poster Goes Viral On Social Media
Photo: “स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला ६० वर्ष लागली अन् जावई…” तरुणानं प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना दिलं चोख उत्तर
loksatta ulta chashma raj thackeray
उलटा चष्मा : असेही सेवा पुरवठादार..
Son Of Farmer Placed To Job Pass Goverment Exam While Farming
VIDEO: जिथे संघर्ष तिथे विजय! वडील शेतात असताना लेकाचा रिझल्ट लागला; एकमेकांना मिठी मारुन रडू लागले बाप-लेक
How To Make Juice Premix Recipes To Save Money
१ वर्ष टिकणारी फळांच्या सरबताची पावडर बनवून संत्री, कलिंगडाचा आस्वाद हवा तेव्हा घ्या; वेळ, पैसे वाचवणारा Video पाहा

मला माझा गणेश स्वत:च पूर्ण करायचा होता ना! एव्हाना आई आणि इतरांनाही माझ्या या स्व-उपक्रमात आवड निर्माण झाली. त्यांना फार कौतुक वाटत होतं आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहनही दिलं. माझा आत्मविश्वास दुपटीनं वाढला आणि मग माझ्या गणूचा गोड चेहरासुद्धा मी एकटय़ानंच तयार केला. फेटा करताना आईची थोडीशी मदत घ्यावी लागली, पण दोन्ही हात, दागिने, मोदक, उंदीर इतर सर्व माझं मीच तयार केलं, तेही घरातल्या मूर्तीला पाहून. माझ्या गणूचे इवले इवलेसे डोळे आणि टिळा करणं मला जरा जास्तच कठीण वाटलं, कारण ते सर्वही मी क्लेनेच तयार केले ना. पण खूप आनंद वाटत होता, जसजसा गणू सुंदर आकार घेऊ लागला तसतसा तब्बल दीड दिवस लागला मला गणू पूर्ण करायला.

हेही वाचा… कार्यरत चिमुकले.. : समुद्रात प्लॅस्टिक आलंच कसं?

पहिल्यांदाच इतकं निरखून गणपतीला पाहिलं. गणू तयार करत असताना प्रश्नही पडले आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळालं. माझं मन त्या काळात फक्त त्यातच गुंतून होतं. म्हणूनच माझा पहिलाच प्रयत्न इतका सफल झाला आणि खूप खूप आनंद झाला.

तुम्हालाही आवडला ना माझा गणू?

जी. एस. शेट्टी इंटरनॅशनल स्कूल, भांडुप, इयत्ता चौथी.