एकदा काय झाले?
खरंच सांगतो दोस्तांनो
एकदा काय घडले
माझे शरीर कापसासारखे
हलके होऊन उडले
तरंगत तरंगत मी
खोलीबाहेर पडलो
जंगल नदी पार करून
डोंगरावरी चढलो
उंच उंच आभाळात
फिरत राहिलो किती
टम्म फुगून ढग झालो
वाटली नाही भीती
आभाळात माझ्यासारखे
बरेच होते ढग
खाली वाकून जणू कसे
पाहत होते जग
मी माझ्या गावावरून
मारीत बसलो चक्कर
वाटेमधल्या ढगांशी
झाली माझी टक्कर
जोरदार टक्कर होता
खूप खूप रडलो
गावच्या माळरानावर
पाऊस होऊन पडलो