बालमित्रांनो, आजचे कोडे जरा वेगळय़ा प्रकारचे आहे. सोबत तुम्हाला काही चित्रे आणि गणितातील संकल्पना यांची यादी दिलेली आहे. थोडा विचार केल्यास यातील प्रत्येक संकल्पना एकेका चित्राशी मिळतीजुळती आहे. तुम्हाला चित्र आणि संकल्पना यांच्या जोडय़ा लावायच्या आहेत.
अपूर्णाक हा पूर्ण संख्येचा एक भाग असतो.
समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत.
परस्पर विरुद्ध कोन समान असतात.
यात डावीकडून उजवीकडे ऋण चढ म्हणजेच उतार आहे.
अ अधिक ब अधिक क अधिक ड बरोबर..
समीकरणाच्या दोन्ही बाजू समान असतात.
वस्तू/बिंदू हलताना त्याचे निर्देशकही (७,८) बदलतात.
उत्तरे : १) अ अधिक ब अधिक क अधिक ड बरोबर..
२) परस्पर विरुद्ध कोन समान असतात. ३) अपूर्णाक हा पूर्ण संख्येचा एक भाग असतो.
४) समीकरणाच्या दोन्ही बाजू समान असतात. ५) वस्तू/बिंदू हलताना त्याचे निर्देशकही (७,८) बदलतात. ६) यात डावीकडून उजवीकडे ऋण चढ म्हणजेच उतार आहे.
७) समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत.
आर्ट गॅलरी कौशल रेडीज, इंडियन एज्युकेशन सोसायटी मा. शाळा, भांडुप, मुंबई.
हिमांशु माईण, सुविद्यालय, बोरीवली.
मधुरा जोशी, महेश विद्यामंदिर, मेहकर