News Flash

श्रावणी शामी कबाब!

दबावाच्या श्रावणाचा विसर पडावा म्हणूनच एक शाकाहारी शामी कबाबची रेसिपी करून बघुया आज...

– यशोधन देशमुख

श्रावण येणार आहे या भीतीनेच कित्येकांनी आषाढ महिन्यात अगदी मनोभावे मांसाहार म्हणजेच मास, मासे आणि अंडी याचा पुरेपूर आनंद घेतला. आणि अचानक एका रात्रीत मन’शुद्धीकरणा’चा विडा उचललून ‘आता महिनाभर मांसाहार भक्षण नाही’ असा पण करून आता जवळपास दोन आठवडे झालेत. आजूबाजूला बघितल्यानंतर अशा लोकांची होणारी तगमग आणि त्यांना जाणवणारा नॉनव्हेज पदार्थांचा विरह हे सगळं बघितल्यानंतर प्रश्न पडतो- श्रावण पाळणे म्हणजे आपल्यावर असलेला सामाजिक दबाव आहे की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण केलेला एक जाणीवपुर्वक प्रयत्न आहे?

श्रावण महिना म्हणजे बहुतांश प्राण्याचा, माशांचा प्रजननाचा काळ. वर्षभर नैसर्गिकरीत्या मांस मासे अंडी यांचा पुरवठा व्हावा यासाठी याकाळात जाणीवपुर्वक वर्ज्य केलेले मांसाहार भक्षण म्हणजेच श्रावण पाळणे, असा अर्थ आहे का?

नक्कीच नाही. कारण याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी आणि पर्यायाने आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मूलभूत आणि सूक्ष्म जीवनसत्वांचा (मायक्रो-न्यूट्रिएन्ट्स) समावेश व्हावा यासाठी आहे. दुसरीकडे, श्रावण महिन्यात सगळीकडे पसरलेल्या हिरवाई बरोबरच दमट आणि कोंदट हवामान देखील असतेच. या काळात मांस मासे यांसारख्या पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांचे (मायक्रो-ऑरगॅनिझम्स) वाढलेले प्रमाण घातक ठरू शकते, तसेच त्यामुळे पचनसंस्थेचे विकारही बळावतात. म्हणूनच या काळात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, रानभाज्या, कंदमुळे असे बरेच पर्याय आपल्या समोर आहेतच की. चला तर मग, दबावाच्या श्रावणाचा विसर पडावा म्हणूनच एक शाकाहारी शामी कबाबची रेसिपी करून बघुया आज…

शाकाहारी शामी कबाब

साहित्य

१ जुडी पालक चिरलेला
१ जुडी मेथी बारीक चिरलेली
१ जुडी लाल माठ चिरलेला
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
२ चमचे बारीक चिरलेली लसूण
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ कप २०० ग्रॅम मोड आलेले हरभरे
१ चमचा लाल तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा चाट मसाला
चवीनुसार मीठ
३ चमचे तूप

कृती

सर्व प्रथम सगळ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या. त्यात हरभरा मीठ आणि ४ पाकळ्या लसूण टाकून कुकरमध्ये ४ शीट्या देऊन उकडून घ्यावेत
आता एका कढईत एक चमचा तूप घ्यावे, त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची आणि कांदा टाकून परतून घ्यावे. आता त्यात पालेभाज्या एकामागोमाग एक टाकून थोडेसे मीठ घालून ३ मिनिटे व्यवस्थित परतून घ्यावे .
लाल तिखट गरम मसाला आणि हरभरे घालून परतावे. एकदा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता हे मिश्रण थोडेसे थंड करून मिक्सरला दरदरीत वाटावे, आणि प्लेटमध्ये काढून त्याचे कबाब बनवावे.
आणि तव्यावर तूप गरम करून शामी कबाब खरपूस तळून घ्यावेत…गरमा गरम सर्व्ह करावेत.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 12:14 pm

Web Title: shravan recipie shami kabab
Next Stories
1 फ्लॉवर आणि ब्रोकोली सॅलड
2 खाऊ खुशाल : मिसळीचे लज्जतदार प्रयोग
3 खाद्यवारसा : बांबूची भाजी
Just Now!
X