राज्यात सत्ता बदल झाल्यावर आरे कॉलनीतील मेट्रो ३ मार्गासाठी आवश्यक असलेला कार शेडचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने कार शेड पुन्हा एकदा आरे कॉलनीतच करण्याचा निर्णय घेतला, एवढंच नव्हे तर फडणवीस सरकारच्या काळात मेट्रे ३ प्रकल्पाची धुरा सांभाळणाऱ्या अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रो रेल कॉरपोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदी पुन्हा नेमणुक करत रखडलेला हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे संकेत दिले.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही कारशेडला विरोध केला असून कार शेड होऊ नये यासाठी पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमीही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.

एकीकडे कार शेडवरुन घमासान सुरु असतांना येणाऱ्या पालिका निवडणुकीत कार शेड होत असलेल्या आरे कॉलनी मध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. महानंदा डेअरी, आरे डेरी, फिल्म सिटी, आरे कॉलनी, युनिट नंबर २२, रॉयल पाल्म असा या वॉर्डचा पसारा आहे.

रेखा रामवंशी यांनी २०१७च्या निवडणुकीत बाजी मारली होती. त्यावेळी प्रमुख लढत ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झाली होती. शिवसेनेच्या रामवंशी यांना सहा हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती. तर रोहीणी सकपाळ यांना २ हजार ३०० पेक्षा जास्त मते मिळाली होती. हा वॉर्ड त्यावेळी अनुसूचित जाती, स्त्रीयांसाठी राखीव होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात चर्चेत ठरलेल्या आणि मेट्रो कार शेड असलेल्या आरे कॉलनी वॉर्डमधून कोणाचा विजय होतो याची उत्सुकता असेल. बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे सध्याच्या स्थानिक राजकीय परिस्थितीत किती बदल होतो हेही बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.