Finance Minister Nirmala Sitharaman Speech, India Budget केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ साठी भारताचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीच्या घोषणांमध्येच त्यांनी वाहतुकीसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकार सामान्य गाड्यांच्या बोगी बदलून वंदे भारत सारख्या बोगी तयार करणार आहेत. याशिवाय मेट्रो आणि नमो रेलचा विस्तार इतर शहरांमध्येही करण्यात येणार आहे.

भारत वाहतुकीच्या आघाडीवर वेग पकडणार

सीतारमण यांनी गुरुवारी सांगितले की, सुमारे ४० हजार रेल्वे बोगींचे वंदे भारत बोगीत रूपांतर केले जाणार आहे. याबरोबरच सरकारने ३ नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली असून, फ्रेट कॉरिडॉरचे कामही सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील विमानतळांची संख्याही वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सध्या देशात १४९ विमानतळे कार्यरत आहेत.

kalyan marathi news, kalyan illegal chicken coop marathi news
कल्याण: कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याचा खुराडा तोडण्याचे आदेश
indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
Congress Leader Rahul Gandhi slam modi government
 ‘रेल्वे वाचविण्यासाठी मोदी सरकार हटविणे गरजेचे’ 
sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई

हेही वाचाः Budget 2024 : ”कर रचनेत कोणताही बदल नाही”, निर्मला सीतारमण म्हणाल्या…”जीएसटी संकलन…”

पर्यटनाला चालना मिळणार

मालदीवबरोबर तणावपूर्ण संबंध असताना सरकारने अर्थसंकल्पात लक्षद्वीपला मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपसह अनेक बेटांवर पर्यटनासाठी नवीन प्रकल्प जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर सोशल मीडियावर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्यात आला होता. यानंतर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने लक्षद्वीपला पोहोचू लागले आहेत.

हेही वाचाः Budget 2024 ”एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्यात आले,” निर्मला सीतारमण म्हणाल्या, ”९ कोटी महिलांच्या…”

तीन मुख्य कॉरिडॉरमध्ये ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर यांचा समावेश आहे. हे नवीन कॉरिडॉर पीएम गती शक्ती उपक्रमांतर्गत ओळखले जाणार आहेत. याशिवाय हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवास सुनिश्चित करण्यात मदत करतील, असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.