Budget 2025 : मोदी ३.० सरकारचा पहिलंवहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांसाठी मोठी घोषणा केली. ही घोषणा अर्थातच ही ठरली की १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. १२ लाख रुपये उत्पन्न आणि स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजार रुपये असा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे. अनेकांचे पगार ६ लाख ते १२ लाख रुपये वार्षिक असे असतात. त्यामुळे याचा फायदा बहुतांश नोकरदार वर्गाला होणार आहे. दरम्यान १२ लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असेल तर काय होईल? हे आपण जाणून घेणार आहोत.

नव्या करप्रणालीनुसार कर कसा लागणार?

० ते ४ लाख रुपये उत्पन्न- कर नाही
४ ते ८ लाख रुपये उत्पन्न- ५ टक्के कर
८ ते १२ लाख रुपये उत्पन्न- १० टक्के कर
१६ ते २० लाख रुपये उत्पन्न- २० टक्के कर
२० ते २४ लाख रुपये किंवा त्यावरील उत्पन्न- ३० टक्के कर

समजा तुमचा पगार वार्षिक १५ लाख रुपये असेल तर काय होईल?

जर तुमचा पगार वार्षिक १५ लाख रुपये असेल तर जुन्या करप्रणाली प्रमाणे ५० हजारांच्या डिडक्शनसह २ लाख ५७ हजार इतका प्राप्तीकर लागू होतो. यात होम लोन, मेडिकल इन्शुरन्स, एलआयसी पॉलिसी अशी गुंतवणूक दाखवल्यानंतर १५ लाखांच्या वार्षिक उत्पन्वार साधारण १ लाख ३० हजारांपर्यंत कर लावला जाईल. मात्र आज सादर झालेल्या नव्या करप्रणालीनुसार आता हा कर १ लाख ३० हजार रुपये नाही तर ९७ हजार ५०० रुपये इतका लागेल. याचाच अर्थ नव्या करप्रणाली नुसार १५ लाखांचं वार्षिक उत्पन्न असलेला नोकरदार हा ३२ हजार ५०० रुपये वाचवू शकणार आहे.

समजून घ्या सोपं गणित

१५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न त्यातून ७५ हजार स्टँडर्ड डिडक्शन वजा केल्यानंतर उरले १४ लाख २५ हजार रुपये. १२ लाखांहून अधिक ते १६ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के कर भरावा लागणार आहे. त्याप्रमाणे नव्या कर प्रणालीनुसार १५ लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर १५ टक्के कर धरल्यास ही रक्कम ९३ हजार ७५० इतकी होते, त्यावर चार टक्क्यांचा सेस लागतो जो ३७५० आहे. त्यामुळे प्राप्तीकराची रक्कम ९७ हजार ५०० इतकी होते. हा हिशेब नीट पाहिला तर लक्षात येतं की नव्या करप्रणालीत जो बदल केला आहे त्यानुसार १५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचे ३२ हजार ५०० रुपये वाचणार आहेत.

कसे वाचणार ३२ हजार ५०० रुपये?

समजा एखाद्या नोकरदार माणसाचं वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपये आहे तर त्यातून स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजार रुपये वजा करायचे. म्हणजे रक्कम उरली १४ लाख २५ हजार रुपेय आता नव्या कर प्रणालीनुसार गणित समजून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ ते १६ लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी १५ टक्के कर आहे. त्यानुसार जसं आपण वरचं गणित पाहिलं एकूण प्राप्तीकर ९७ हजार ५०० रुपये होते. आधीच्या करप्रणालीत प्राप्तीकर २० टक्के असल्याने कराची रक्कम १ लाख ३० हजार इतकी होत होती. मात्र आता नव्या करप्रणालीनुसार करदात्यांचे ३२ हजार ५०० रुपये वाचणार आहेत. आज तकने हे वृत्त दिलं आहे.