मुंबई : विविध स्मारके, गडकिल्ले, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अष्टविनायक मंदिरे तसेच पंढरपूर देवस्थानच्या विकासासाठी निधी देण्यात येणार आहे. पर्यटन विकासावर १७०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 मुंबईत मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन गुढीपाडव्याला होत असून त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ऐरोली येथील मराठी भाषा संशोधन उपकेंद्रासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांचे स्मारक म्हणून त्यांच्या नावाने सुूरू करण्यात येणाऱ्या कलिनातील आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या आफ्रिकन सफारीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम १२ मार्चपासून २०२१ पासून सुरू झाला असून त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दर्शविणारा मराठी, हिंदूी व इंग्रजी भाषेतील ध्वनिप्रकाश कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया वास्तूवर प्रदर्शित केला जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांना निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मासिक १० हजार रुपयांची मर्यादा ३० हजार रुपये करण्यात आली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातील फुलेवाडा स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात

गडकिल्ल्यांचा विकास: रायगड किल्ला व परिसर विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी रुपये तर मुंबईतील शिवडी आणि सेंट जॉर्ज किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर विकास आराखडय़ाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आणि वढा (जि. चंद्रपूर) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखडय़ासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपये निधी दिला जाणार आहे.

’पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखडय़ासाठी ७३ कोटी ८० लाख रुपये. अष्टविनायक विकास आराखडय़ासाठी ५० कोटी 

’स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी १० शाळांना प्रत्येकी एक कोटी रुपये

’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकांचे काम वेगाने

’जावळी तालुक्यातील शिवसागर जलाशयात जलपर्यटन प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये

’औरंगाबाद येथे अमृतमहोत्सवी वंदेमातरम सभागृहाचे काम पूर्ण करण्यासाठी ४३ कोटी रुपये