4 Ways Banks Are Overcharging Borrowers On Loan Interest: कर्ज मिळवणे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे त्याची परडफेड करणे ही एक मोठी कसरत आहे. अशात बँका आणि वित्तीय संस्था ज्या पद्धतीने कर्जदारांकडून व्याजदरांवर, विशेषतः फ्लोटिंग-रेट कर्जांमध्ये, अतिरिक्त शुल्क आकारत आहेत त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे.

जर तुम्हाला तुमच्या गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जावर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करावा लागत असेल तर, त्याला तुमच्या बँकेची कर्ज धोरणे कारणीभूत असू शकतात. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशा काही गोष्टी समोर आणल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून कर्जदारांची मोठी रक्कम वाचणार आहे.

१. मनमानी व्याजदर

आरबीआयने म्हटले आहे की, एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटसारख्या बेंचमार्क दरांव्यतीरिक्त स्प्रेड किंवा मार्कअप प्रमाणे व्याज आकारताना बँका एकसमान, पारदर्शक प्रक्रिया लागू करत नाहीत. यामुळे एकसारखे कर्ज असलेल्या कर्जदारांना कोणतेही तर्क नसताना वेगवेगळे व्याजदर आकारले जातात.

कर्जदारांनी काय करावे?

बँकेकडे बेंचमार्क आणि आकारलेल्या स्प्रेडसह तुमच्या व्याजदराचे विभाजन करण्याची विनंती करा. जर तुमचा क्रेडिट प्रोफाइल सुधारली असेल तर तुमच्या कर्जदात्याला स्प्रेड कमी करण्याची विनंती करा. अशा वेळी तुमच्याकडे कमी स्प्रेड आकारणाऱ्या दुसऱ्या कर्जदात्याकडे देखील जाण्याचा पर्याय असतो.

२. व्याजदर कपात करण्यास विलंब

आरबीआयनुसार, काही बँका जेव्हा आरबीआय व्याजदर वाढवते तेव्हा कर्जाचे व्याजदर वाढविण्यास तत्पर असतात परंतु व्याजदर कमी झाल्यावर मात्र ते कमी करण्यात या बँका विलंब करतात. याचा कर्जदारांना फटका बसतो.

कर्जदारांनी काय करावे?

आरबीआयच्या रेपो दर घोषणांची माहिती ठेवा तुमच्या बँकेच्या ईबीएलआर बदलांचा मागोवा घ्या. जर तुमची बँक त्वरित यामध्ये बदल करत नसेल, तर याबाबत त्यांच्याकडे तक्रार नोंदवा. तक्रारीनंतरही त्यांनी दखल घेतली नाही, तर चांगल्या ट्रान्समिशन रेकॉर्ड असलेल्या दुसऱ्या बँकेत बॅलन्स ट्रान्सफर करण्याचा विचार करा.

३. ग्राहकांना कमी व्याजदरांबद्दल माहिती न देणे

आरबीआयच्या म्हणण्याप्रमाणे, बँका अनेकवेळा नव्या कर्जदारांना कमी व्याजदरात कर्ज देतात. पण याचप्रकारचे कर्ज घेतलेल्या जुन्या ग्राहकांनी ते कमी झालेल्या व्याजदरांबाबत माहिती देत नाहीत. यामुळे जुन्या कर्जदारांना जास्त व्याज भरावे लागते.

कर्जदारांनी काय करावे?

वेळोवेळी, तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्या बँकेच्या नव्या कर्जदारांनी ते कोणत्या व्याजदराने कर्ज पुरवाता याची माहती घ्या. जर नव्या कर्जदारांनी कमी व्याजदराने कर्ज दिले असेल तर तुमचा व्याजदरही कमी करण्याची विनंती करा.

४. फ्लोटिंग रेट बदलामध्ये पारदर्शकतेचा अभाव

आरबीआयनुसार बहुतेक बँका बेंचमार्क रेट बदलले तरी दरम्यानच्या काळात वर्षातून एकदा किंवा त्याहूनही कमी वेळा फ्लोटिंग व्याजदरात बदल करतात.

कर्जदारांनी काय करावे?

तुमच्या कर्जाच्या व्याजदरावर सातत्याने लक्ष ठेवा. त्यामध्ये किती वेळा बदल केला जातो हे सुद्धा पाहा. की रीसेट किती वेळा केले जाते. शक्य असल्यास, अधिक वेळा रीसेट करा. रीसेट सायकल जितकी कमी असेल तितक्या लवकर तुम्हाला व्याजदर कमी झाल्यावर फायदा मिळेल. जर तुमचा कर्जदाता लवचिक रीसेट देत नसेल, तर तुमचे कर्ज पुनर्वित्त करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्या कर्जाच्या व्याजदरावर नियमितपणे लक्ष ठेवा. त्यामध्ये किती वेळा बदल (रीसेट) केला जातो, हेही तपासा. शक्य असल्यास, व्याजदरात वारंवार बदल होईल, अशा प्रकारचे कर्ज निवडा. रीसेट सायकल जितकी लहान असेल, तितक्या लवकर व्याजदर कमी झाल्यास त्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.