September 2023 Bank Holidays : भारतात काही दिवसात सणासुदीला सुरुवात होणार आहे, सप्टेंबर महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत.अशा परिस्थितीत जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, लवकर पूर्ण करून घ्या. त्याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांची यादी जरूर पहा.

सप्टेंबर महिन्यात अनेक सण असतात. अशा स्थितीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण १६ दिवस बँकांना सुट्टी असेल. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही ही सुट्टी असेल. या महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत.

RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्थानिक सणांनुसार राष्ट्रीय सुट्ट्या आणि प्रादेशिक सुट्ट्यांदिवशी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका आणि सहकारी बँका बंद राहतील. प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकार ठरवते. ६ आणि ७ सप्टेंबर रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी आणि २८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद यासारख्या राष्ट्रीय सुट्ट्यांवर देशभरातील बँका बंद राहतील. शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी ग्राहकांना बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो. इंटरनेट बँकिंग सेवा आणि ATM संपूर्ण देशात सर्व दिवस कार्यरत राहतील.

हेही वाचा – २०० रुपये किलो टोमॅटोसाठी तयार व्हावं लागणार! या आठवड्यातील बाजारातील आकडेवारी पाहा

सप्टेंबर महिन्यातील सर्व राज्यनिहाय बँक सुट्ट्यांची यादी येथे आहे:

  • ३ सप्टेंबर २०२३: रविवार
  • ६ सप्टेंबर २०२३: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त
  • ४ सप्टेंबर २०२३: जन्माष्टमी आणि श्रीकृष्ण अष्टमी
  • ८ सप्टेंबर २०२३: दुसऱ्या शनिवार
  • १० सप्टेंबर २०२३: रविवार
  • १७ सप्टेंबर २०२३: रविवारम
  • १८ सप्टेंबर २०२३: विनायक चतुर्थी
  • १९ सप्टेंबर २०२३: गणेश चतुर्थी
  • २० सप्टेंबर २०२३: गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) आणि नुआखाई (ओडिशा).
  • २२ सप्टेंबर २०२३: श्री नारायण गुरु समाधी दिन.
  • २३ सप्टेंबर २०२३: महाराजा हरिसिंह यांचा वाढदिवस आणि दुसऱ्या शनिवार
  • २४ सप्टेंबर २०२३: रविवार
  • २५ सप्टेंबर २०२३: श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंती
  • २७ सप्टेंबर २०२३: मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस).
  • २८ सप्टेंबर २०२३: ईद-ए-मिलाद किंवा ईद-ए-मिलादुन्नबी (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस)
  • २९ सप्टेंबर २०२३: ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू आणि श्रीनगर)

हेही वाचा – Rakshabandhan : रक्षाबंधनाला बहिणीला डिजिटल गोल्ड गिफ्ट देणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात.