देशातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या श्री सिमेंटवर २३ हजार कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सोमवारी कंपनीचे शेअर १० टक्क्यांनी घसरले आणि कंपनीच्या बाजारमूल्यही कमी झाले. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर २५ हजार रुपयांवरून २२ हजार रुपयांच्या पातळीवर आला. सध्या कंपनीचा शेअर २३ हजार रुपयांच्या पातळीवर व्यवहार करीत आहे. प्राप्तिकर विभागाने गेल्या आठवड्यात सिमेंट बनवणाऱ्या कंपनीच्या पाच ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. बेवार, जयपूर, चित्तोडगड आणि अजमेर येथील कंपनीच्या तळांवर छापे टाकण्यात आले. गेल्या दोन व्यवहार दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

कंपनीने दिले स्पष्टीकरण

सिमेंट कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात प्राप्तिकर सर्वेक्षणाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, कंपनीची संपूर्ण व्यवस्थापन टीम अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करीत आहे आणि माध्यमांमध्ये प्रसारित होणारी कोणतीही माहिती चुकीची आहे. वरील सर्वेक्षणाच्या संदर्भात मीडियाच्या काही विभागांमध्ये कंपनी आणि तिच्या अधिकार्‍यांबद्दल बरीच नकारात्मक माहिती सुरू असल्याचे आम्हाला आढळले आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की सर्वेक्षण अद्याप चालू आहे, असंही कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचाः भरती प्रक्रियेत लाचखोरी झाल्याचे आरोप TCS नं फेटाळले; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण

सकाळी ११:५७ वाजता कंपनीचा शेअर बीएसईवर ८ टक्क्यांनी घसरून २३,१५० रुपयांवर व्यवहार करीत होता. गेल्या वर्षी कंपनीच्या स्टॉकमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली होती. २१ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या शेअरने २७,००० रुपयांची पातळी ओलांडली. तर आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर २२६०१.३० रुपयांसह दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आणि शुक्रवारी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी २५,१४४.८५ रुपयांवर बंद झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः २००० च्या नोटेनंतर आता ५०० रुपयांच्या नोटेबाबत मोठी माहिती; काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य?