नवी दिल्ली : सरलेल्या जून महिन्यात कांदा, बटाटा व टोमॅटोच्या किमती कडाडल्यामुळे शाकाहारी थाळीची सरासरी किंमत १० टक्क्यांनी वाढली. मात्र दुसरीकडे ब्रॉयलर चिकनच्या किमतीत घटीने मांसाहारी जेवणाची सरासरी किंमत घटली, असे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या क्रिसिल मार्केट इंटेलिजेंसच्या अहवालात म्हटले आहे.

जून महिन्यात टोमॅटोच्या दरात ३० टक्के, बटाट्याच्या दरात ५९ टक्के आणि कांद्याच्या दरात ४६ टक्के वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या एकूण किमतीत वाढ झाली आहे. वार्षिक तुलनेतच नव्हे, तर मागील महिन्याच्या तुलनेतही भाज्यांची दरवाढ ही एकंदर किंमतवाढीस कारणीभूत ठरली आहे.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याचे भाव कडाडले; चांदीही महागली, गेल्या २४ तासांत ‘एवढ्या’ वाढल्या किमती, मुंबई-पुण्यात तर…

चपाती, भाज्या (कांदे, टोमॅटो आणि बटाटे), तांदूळ, डाळ, दही आणि कोशिंबीर यांचा समावेश असलेल्या शाकाहारी थाळीच्या किमती जूनमध्ये १० टक्क्यांनी वाढून २९.४ रुपये प्रति थाळी झाल्या आहेत. गेल्या वर्षी तिची सरासरी किंमत २६.७ रुपये होती. तर महिन्याभरापूर्वी म्हणजेच मे २०२४ मध्ये २७.८ रुपये होती, असे अहवालात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रब्बी क्षेत्रामध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे कांद्याची आवक कमी झाली, तर मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे बटाट्याचे उत्पादन कमी झाले. उच्च तापमानामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील टोमॅटोच्या उन्हाळी पिकाची आवक ३५ टक्क्यांनी घटली.