Premium

एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीत पुन्हा पहिल्या स्थानावर, जाणून घ्या गौतम अदाणी कोणत्या स्थानी?

ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, एलॉन मस्कची एकूण संपत्ती १.९८ अब्ज डॉलरने वाढली आहे. म्हणजेच आता त्यांची एकूण संपत्ती १९२ अब्ज डॉलर आहे.

gautam adani elon mask

जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा एकदा फेरबदल झाला आहे. यंदा टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. एलॉन मस्कने बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकले आहे. एलॉन मस्कच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत १.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मस्कची एकूण संपत्ती किती आहे?

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, एलॉन मस्कची एकूण संपत्ती १.९८ अब्ज डॉलरने वाढली आहे. म्हणजेच आता त्यांची एकूण संपत्ती १९२ अब्ज डॉलर आहे. फ्रेंच उद्योगपती अरनॉल्टला ५.३५ बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे, आता त्यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर आहे. ते आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे.

हेही वाचाः हायर पेन्शन ते म्युच्युअल फंड; ‘हे’ ८ नियम जून महिन्यात बदलणार, तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार?

टॉप १० अब्जाधीश कोण आहेत?

एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर तर बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जेफ बेझोस हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १४४ अब्ज डॉलर आहे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे १२५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत लॅरी एलिसन पाचव्या स्थानावर आहे. त्यांची नेटवर्थ किंमत ११८ अब्ज डॉलर आहे. श्रीमंतांच्या यादीत स्टीव्ह बाल्मर सहाव्या, वॉरेन बफे सातव्या स्थानावर आहेत. लॅरी पेज जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. सर्गे ब्रिन नवव्या स्थानावर असून, त्यांची एकूण संपत्ती १०६ अब्ज डॉलर आहे. श्रीमंतांच्या यादीत १० व्या क्रमांकावर मार्क झुकेरबर्ग आहेत, त्यांची एकूण संपत्ती ९६.५ अब्ज डॉलर आहे.

हेही वाचाः LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात कपात; LPG ८३ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

या यादीत भारतीय उद्योगपतींचे नाव कुठे?

जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपतींचीही नावे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी जगातील अब्जाधीशांच्या यादीत १३ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८४.७ अब्ज डॉलर आहे. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांची एकूण संपत्ती ६१.३ डॉलर आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १९व्या स्थानावर आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Elon musk tops the rich list again know where gautam adani ranks vrd

First published on: 01-06-2023 at 14:40 IST
Next Story
हायर पेन्शन ते म्युच्युअल फंड; ‘हे’ ८ नियम जून महिन्यात बदलणार, तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार?