पीटीआय, नवी दिल्ली

भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी त्यांचे ‘पॅन’ मार्चअखेरपर्यंत आधारशी संलग्न करावे, असे निर्देश ‘सेबी’ने बुधवारी दिले. पॅन आधारशी संलग्न न केल्यास गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात व्यवहारही शक्य होणार नाही, असा इशाराही नियामकांनी दिला आहे.

भांडवली बाजारातील व्यवहार सुकर व्हावेत, यासाठी गुंतवणूकदारांना पॅन आधारशी संलग्न करण्यास सांगण्यात आले आहे. याचे पालन न केल्यास त्यांची ‘केवायसी’ प्रक्रिया अपूर्ण मानली जाईल. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांच्या भांडवली बाजारासह इतर व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात. हे निर्बंध त्यांचे पॅन आधारशी संलग्न होईपर्यंत कायम राहतील, असे सेबीने म्हटले आहे.

आणखी वाचा-क्रेडिट कार्डचा देणी थकिताचा जानेवारीत विक्रम; २९.६ टक्के वाढीसह १.८७ लाख कोटींचा उच्चांक

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) याबाबत मागील वर्षी मार्च महिन्यात परिपत्रक काढले होते. त्यात म्हटले होते की, पॅन आधारशी ३१ मार्च २०२३ पर्यंत संलग्न करणे आवश्यक आहे. जोडणी न केल्यास पॅन बंद होईल. नंतर प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार पॅन सादर न करणे अथवा पॅनचा उल्लेख न केल्याबद्दल दंडात्मक कारवाईस संबंधित व्यक्ती पात्र असेल.

आणखी वाचा- बाजारातील माणसं : शेअर बाजाराचे माजी अध्यक्ष भगीरथ मर्चंट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भांडवली बाजारातील सर्व व्यवहारांसाठी ‘केवायसी’ माहितीमध्ये पॅन बंधनकारक आहे. याचबरोबर सेबी नोंदणीकृत कंपन्या आणि इतर संस्थांसाठीही गुंतवणूकदारांनी पॅन सादर करणे गरजेचे आहे. आता गुंतवणूकदारांना पॅन आधारशी संलग्न करण्यास ३१ मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली आहे.