मुंबई : जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रारंभिक समभाग विक्रीला गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. प्रारंभिक समभाग विक्रीच्या अखेरच्या दिवशी गुंतवणूकदारांकडून १४६.९० अधिक भरणा झाला आहे. संस्थात्मक खरेदीदारांकडून सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, कंपनीने आयपीओच्या माध्यमातून १.४१ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. मात्र त्यातुलनेत गुंतवणूकदारांकडून सुमारे २०८ कोटी समभागांची मागणी नोंदवण्यात आली. आयपीओ २३ जुलैपासून विक्रीसाठी खुला झाला होता. आयपीओ खुला होताच पहिल्या तासात चार पट अधिक भरणा प्राप्त झाला होता.

बिगर-संस्थागत गुंतवणूकदारांकडून जोरदार मागणी दिसून आली, त्यांच्यासाठी राखीव भागासाठी २२६.४५ पट मागणी आली आहे, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव भागासाठी ४५.३२ पट अधिक मागणी नोंदवली गेली. मात्र पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी असलेल्या राखीव भागासाठी २६६.२१ पट प्रतिसाद लाभला. जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सने मंगळवारी सुकाणू गुंतवणूकदारांकडून १३८ कोटी रुपयांच्या निधीची उभारणी केली.

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ २३ जुलै ते २५ जुलैपर्यंत खुला होता. कंपनीने आयपीओसाठी २२५ ते २३७ रुपये किंमत पट्टा निश्चित केला होता. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) येत्या ३० जुलैला समभाग सूचिबद्ध होणार आहे. सुमारे ४६०.४३ कोटी रुपयांची निधी उभारणी होणार असून, ज्यामध्ये ४०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांचा आणि भागधारकांकडील सुमारे ६०.४३ कोटी रुपये मूल्याचे समभाग आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले.

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओमधून उभा राहणारा निधी मुख्यतः कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यापैकी ३२० कोटी रुपये कंपनी आणि तिची प्रमुख उपकंपनी, इलेक्ट्रॉनिक्स बाजार एफझेडसीने घेतलेल्या काही थकित कर्जांची परतफेड आणि अग्रिम देणी फेडण्यासाठी वापरले जातील. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी राखीव ठेवण्यात येईल. मंगळवारच्या सत्रात सुकाणू गुंतवणूकदारांकडून १३८ कोटी रुपयांची निधी उभारणी करण्यात आली आले. जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या नूतनीकरणात गुंतलेली आहे, ज्याचे कामकाज भारत, अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालते.

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सचे समभाग ३० जुलैला मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध होणार आहे, तर त्याआधी २८ जुलै रोजी गुंतवणूकदारांना समभागांचे वाटप अपेक्षित आहे.

ग्रे बाजारात किती मागणी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रे बाजारामधील क्रियाकलापांचा मागोवा घेणाऱ्या मंचानुसार, जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सचा समभाग १०५ रुपयांच्या अधिमूल्यावर व्यवहार करत आहे, जे किंमत पट्ट्याच्या वरच्या किमतीपेक्षा सुमारे ४४.३ टक्के अधिक वाढ दर्शवते.