सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठबळामुळे देशातील नोंदणीकृत नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमांची संख्या ऑटोबरअखेरपर्यंत १,१४,९०२ पर्यंत वाढली आहे, अशी माहिती बुधवारी संसदेत देण्यात आली. हे नवउद्यमी महत्त्वाकांक्षी ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांतर्गत कर आणि करोत्तर वित्तीय प्रोत्साहन मिळविण्यासाठी पात्र आहेत.

देशात नवउद्यमी संस्कृतीला चालना देण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने १६ जानेवारी २०१६ रोजी ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रम सरकारने सुरू केला होता. अर्थव्यवस्थेत वाढीसह, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे उद्दिष्ट यातून राखण्यात आले आहे. हे मान्यताप्राप्त नवउद्यमी उपक्रम माहिती-तंत्रज्ञान सेवा, वित्त तंत्रज्ञान, हार्डवेअर तंत्रज्ञान, एंटरप्राइज सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॅनोटेक्नॉलॉजी यांसारख्या ५६ वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये पसरलेले आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग पीयूष गोयल यांनी दिली. देशभरात ६४० हून अधिक जिल्ह्यांमध्ये नवउद्यमी उपक्रम पसरले आहेत आणि त्यांच्याद्वारे एकंदरीत सात लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्याची नोंद आहे.

हेही वाचा… लोकसभा निवडणुकीआधी डिजिटल इंडिया कायदा अशक्य, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांची कबुली

हेही वाचा… ‘बिटकॉइन’चे मोल पुन्हा ४४ हजार डॉलरवर !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्न आणि दागिन्यांची निर्यात घसरली

अमेरिका, हाँगकाँग, मध्य पूर्व आणि चीनसारख्या प्रमुख निर्यात स्थळांमधील मागणी कमी होणे आणि स्पर्धात्मक दरात कच्च्या मालाची अनुपलब्धता अशा आव्हानांमुळे हिरे आणि दागिने निर्यात उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत. २०२२-२३ मध्ये रत्न आणि दागिन्यांची निर्यात ३९.२७ अब्ज डॉलर होती, जी मागील वर्षी याच कालावधीत ३८.११ अब्ज डॉलर होती. गेल्या वर्षीच्या निर्यातीच्या तुलनेत त्यात २.९५ टक्क्यांची घसरण झाली आहे, असे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले.