पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्र अर्थात महाबँकेची नवउद्यमींसाठी (स्टार्टअप) समर्पित पहिली शाखा सुरू करण्यात आली. महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी बँकेच्या पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील यशोमंगल इमारतीत पुणे शहर विभागीय कार्यालयात नवउद्यमींसाठी समर्पित या शाखेचे उद्घाटन केले.

नवउद्यमी आणि युनिकॉर्न उद्योगांचे केंद्र म्हणून भारत झपाट्याने जगाच्या केंद्रस्थानी येत असून, त्याला प्रतिसाद देत नवउद्यमींना भांडवल उभारणीसाठी मदत व्हावी यासाठी खास नवउद्यमी शाखा सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांना ‘आयपीओ’च्या माध्यमातून भांडवल उभारणी करता यावी यासाठी मदत करण्यात येईल. आमच्यासारख्या विकासाभिमुख बँकांसाठी हे कार्य अनिवार्य आहे, असे शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी राजीव म्हणाले. पुणे शहरातील तंत्रज्ञान व औद्योगिक विकासाचे वातावरण आणि उद्योगांना वित्तपुरवठ्याच्या बाबतीत बँकेचे प्रावीण्य व अनुभव लक्षात घेता पहिली शाखा येथे सुरू करणे हे आमच्या विकासाभिमुख व समाजाभिमुख दृष्टिकोनाला व व्यवसायवाढीला पूरकच ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – पुणे : भावी खासदार म्हणून भाजप शहराध्यक्षांची फलकबाजी

हेही वाचा – ‘एमआयडीसी’तील विलगीकरण न केलेला कचरा उचलणे आजपासून बंद, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाबँकेचे कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार व आशीष पांडे हेही उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे संयुक्त संचालक सदाशिव सुरवसे, भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या साहसी भांडवली निधीचे उपाध्यक्ष सजित कुमार, तसेच बँकेचे कर्मचारी, अनेक स्टार्टअप उद्योजक आणि ग्राहक या प्रसंगी उपस्थित होते.