वृत्तसंस्था, नवी दिल्ली

खनिज तेलाच्या पुरवठ्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी इराकसह पश्चिम आशियाई देशांतील पारंपरिक पुरवठादारांशी पुन्हा चर्चा सुरू केल्या आहेत. रशियाच्या खनिज तेलावरील सवलत कमी झाल्याने तसेच आर्थिक व्यवहाराच्या पूर्ततेतील अडचणी पाहता तेल कंपन्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

रशियाच्या खनिज तेलावर जी-७ राष्ट्रगटाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे त्या तेलाच्या आयातीवर पिंपामागे ६० डॉलर या मर्यादेपर्यंत किंमत नियंत्रण आहे. जोवर या किमतीखाली सवलतीत उपलब्धता होती, तोवर रशियन तेलाचे भारतीय कंपन्यांमध्ये आकर्षण होते. मात्र अलीकडच्या आठवड्यात ही सवलत मोठ्या प्रमाणात लोप पावली आहे आणि आयात किंमत जर जी-७ राष्ट्रगटाने लादलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर रशियन तेलाची आयात खरेदी केली जाणार नाही, असे तेल क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-विस्ताराचे कर्मचारी एअर इंडियाच्या सेवेत

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तेल कंपन्यांकडून इराकी तेलाच्या अधिक खरेदीसाठी पावलेही टाकली आहेत. तेल आयातीचा मोबदला चुकता करण्यासाठी उधारीचा कालावधी सध्याच्या ६० दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवण्यासारख्या व्यवहार पूर्ततेच्या अधिक चांगल्या अटी-शर्तींचा विचार करण्यास भारताने इराकला विनवणी केली आहे. त्या जर मान्य केल्या गेल्या तर इराकमधून तेल आयात करण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा- यूट्यूबवरच्या कमाईवरही आता इन्कम टॅक्स विभागाचा डोळा; पै न् पैचा हिशेब ठेवा अन्यथा…

इराककडून सकारात्मक प्रतिसाद

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाआधी इराक हा भारताचा पारंपरिक तेल पुरवठादार होता. त्यावेळी रशियाकडून होणारा तेलाचा पुरवठा नगण्य होता. मात्र, मागील १५ महिन्यांत रशिया हा भारताचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश बनला आहे. रशियन तेलावर उपलब्ध सवलतीतील किंमत याला कारणीभूत ठरली. सध्या देशाच्या एकूण खनिज तेल आयातीत रशियाचा वाटा ४० टक्के आहे. आता इराकने भारताला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याआधी त्या देशाने भारताला तेल आयातीच्या बदल्यात अनेक सवलती दिल्या आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.