Reliance Jio Mart Layoff : रिलायन्स रिटेलने जिओ मार्टच्या १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची माहिती मिळाली आहे. ईशा अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलने अलीकडेच जर्मन रिटेलर मेट्रो कॅश अँड कॅरी घाऊक व्यवसाय २७०० कोटींना विकत घेतला. यानंतर कंपनी दोन्ही व्यवसाय एकत्रित करण्याच्या कामात गुंतलेली आहे. JioMart ने मेट्रो कॅश अँड कॅरीचे अधिग्रहण केल्यानंतर कामकाज सुरळीत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

येत्या काही आठवड्यांत रिलायन्स इंडस्ट्रीची जिओ मार्ट एक मोठा खर्च कपात करण्याचा उपक्रम राबविण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये जिओ मार्टमधील कर्मचारी संख्या दोन तृतीयांश कमी करण्याचाही समावेश आहे. जिओमार्टने आपल्या कॉर्पोरेट कार्यालयातील ५०० अधिकाऱ्यांसह १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

मेट्रो कर्मचाऱ्यांची रिलायन्स रिटेलमध्ये बदली

मेट्रोच्या संपादनानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांची रिलायन्स रिटेलमध्ये बदली करण्यात आली आणि अनेक अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले. रिलायन्स रिटेलने त्यांच्या किरकोळ व्यवसायाच्या इतर वर्टिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचाः अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून ‘या’ व्यक्तीने १०० दिवसांत कमावले ७६८३ कोटी; आता टाकला आणखी एक डाव

कर्मचाऱ्यांना कामगिरी सुधारण्यास सांगितले

शेकडो कर्मचाऱ्यांना कामगिरी सुधारण्यास सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर कंपनीच्या सेल्स टीममध्ये काम करणाऱ्या अनेकांना मासिक पगारातून कमिशन आधारित मॉडेल स्वीकारण्यास सांगितले आहे. या प्रकारच्या प्रक्रियेत कर्मचार्‍यांना विक्रीच्या कामगिरीवर आधारित पगार मिळणार आहे. रिलायन्स रिटेलमध्ये सुमारे चार लाख कर्मचारी आहेत.

हेही वाचाः ‘या’ तारखेपर्यंत एक रुपयाही न भरता तुमचे आधार अपडेट करता येणार, कसा मिळवाल फायदा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूल्यांकन प्रक्रियेचा भाग

दरवर्षी होणाऱ्या मूल्यांकन प्रक्रियेचा हा भाग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रिलायन्स रिटेलने पीटीआयच्या प्रश्नांनाही यासंदर्भात उत्तर दिले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला मेट्रोने आपल्या भारतातील व्यवसायाची २७०० कोटींची विक्री पूर्ण केली, सर्व ३१ घाऊक स्टोअर्स, तिचा संपूर्ण रिअल इस्टेट पोर्टफोलिओ आणि तिचे सर्व कर्मचारी रिलायन्स रिटेलकडे हस्तांतरित केले आहेत. रिलायन्स रिटेलमध्ये सुमारे चार लाख कर्मचारी आहेत, ज्यात मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियातून जोडलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.