List of Cities Issuing e-Passports in India : पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. याशीवाय तुम्ही विदेशात प्रवास करू शकत नाहीत. पण आता बारत सरकारकडून ई-पासपोर्ट सेवा जारी केली आहे. ई-पासपोर्टची सेवा तुम्हाला काही मोजक्याच शहरांमध्ये देण्यात आली आहे.
ई-पासपोर्ट म्हणजे नेमकं काय?
ई-पासपोर्ट किंवा बायोमेट्रिक पासपोर्ट हा नेक्स्ट जनरेशन प्रवास दस्तऐवज आहे. यात बिल्ट-इन चिप असते, ज्यामुळे तुमच्या पासपोर्टमध्ये ओळखसंदर्भात फसवूक होण्याचा धोका नसतो. भारत सरकारने पासपोर्ट सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात सुरक्षा वाढवण्यासाठी ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे.
ई-पासपोर्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप असलेला पासपोर्ट होय. यात संबंधित व्यक्तीची बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती देण्यात आलेली असते. विशेष बाब म्हणजे तुमचा हा पासपोर्ट कुठेही हरवण्याची किंवा तो चोरी होण्याची भीती नसते. इतकेच नाही तर त्यात छेडछाड होण्याचाही धोका नसतो.
ई-पासपोर्टमध्ये कोणती माहिती असते?
पासपोर्टमधील ई-चिपमध्ये –
- संबंधित व्यक्तीचा फोटो
- बायोमेट्रिक डेटा
- पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता इत्यादी माहिती.
- पासपोर्ट जारी करणाऱ्या अथॉरिटीची डिजिटल सही
- युनिक पासपोर्ट आयडी, पासपोर्ट जारी करण्याची तारीख आणि एक्स्पायरी डेट
भारतात ई-पासपोर्ट कुठे मिळेल?
भारत सरकारने देशात ई-पासपोर्टची सुविधा सुरू केल्यानंतर बायोमेट्रिक ई-पासपोर्ट वापरणाऱ्या देशांच्या यादीत भारतही सामील झाला आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, फ्रान्स, इटली, जपानसह १२० हून अधिक देशांचा समावेश आहे. आता ई-पासपोर्टमुळे प्रत्येक जण आंतरराष्ट्रीय स्तरावर सहजपणे प्रवास करू शकतो.
‘पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.०’ अंतर्गत भारतात ई-पासपोर्ट सेवा एप्रिल २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. ज्यामध्ये नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, सुरत व रांची यांसारख्या काही प्रमुख शहरांमध्ये त्याची चाचणी घेण्यात आली होती. सध्या काही मोजक्या शहरांत ई-पासपोर्ट जारी केला जात आहे.
भारतातील ई-पासपोर्ट जारी केला जातो अशा शहरांची यादी –
२०२५ पर्यंत देशातील काही निवडक शहरांमध्ये ई-पासपोर्ट जारी केले जात आहेत –
- दिल्ली
- बेंगळुरू
- मुंबई
- चंदीगड
- कोची
- चेन्नई
- लखनौ
- अहमदाबाद
- हैदराबाद
- कोलकाता
ई-पासपोर्टचे फायदे आणि उपयोग
- ई-पासपोर्टमुळे सुरक्षेत वाढ होते. तसेच, डेटा संरक्षणदेखील वाढते.
- ई-पासपोर्टमुळे जलद इमिग्रेशन करता येते.
- फसवणूक होण्याचा धोका कमी होतो.
- आयसीएओ मार्गदर्शक तत्त्वांनुसार जागतिक स्तरावर हा पासपोर्ट स्वीकारला जातो.
- आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुव्यवस्थित पडताळणी होते.
आता या ई-पासपोर्टची फी किती असते, असा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर, नियमित पासपोर्टइतकीच ई-पासपोर्टची फी असते.
ई-पासपोर्टची वैशिष्ट्ये काय?
१. ई-पासपोर्टमध्ये बिल्ट इन चिप असते.
२. त्यामध्ये आयरिस स्कॅन, फोटो, फिंगरप्रिंट्स यांसारखी विविध माहिती असते.
३. ई-पासपोर्टमुळे बनावट किंवा ड्युप्लिकेट पासपोर्टचा धोका कमी होतो.
आता हा ई-पासपोर्ट कुठे मिळेल आणि त्यासाठी कसा अर्ज करायचा?
ई-पासपोर्ट मिळविण्यासाठी ‘पासपोर्ट सेवा’ वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर ई-पासपोर्ट अॅप्लिकेशन फॉर्म भरा. तुमचे पासपोर्ट सेवा केंद्र निवडा किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र निवडा. त्यानंतर तुमची अपॉइंटमेंट शेड्यूल करा. तुमच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि बायोमेट्रिक डेटा कलेक्शनसाठी पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला भेट द्या.यानंतर तुम्हाला तुमचा ई-पासपोर्ट मिळून जाईल.