कोण म्हणते स्त्रिया फक्त घराच्या चार भिंतींत अन्न शिजवण्यासाठी आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी बनल्या आहेत. तिने मनात आणले, तर ती घर आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टींचे यशस्वीपणे मल्टीटास्किंग करू शकते. भारतातही अशी अनेक उदाहरणे आहेत; ज्यांची आपली पुढील पिढी अनुसरण करू शकते. आजच्या काळात आयटी कंपन्यांपासून फॅशन आणि कॉस्मेटिक क्षेत्रापर्यंत महिलांचे राज्य आहे. तुम्ही कधी अशी सुरुवात केली आहे का? जी अयशस्वी ठरली आणि मग एका झटक्यात तुमचा सगळा आत्मविश्वास संपला. जर हे सर्व तुमच्या बाबतीतही घडले असेल, तर मग आज तुम्ही स्वबळावर अब्जाधीश बनलेल्या या महिलेकडून शिकायला हवे.

मुलाच्या आजारपणामुळे डोके लढवले

credit card spending soar to 27 percent
क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

आम्ही बोलत आहोत ते ‘मामाअर्थ’च्या सह-संस्थापक गझल अलघ यांच्याबद्दल. मामाअर्थ हा आज भारतातील एक प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. सहा वर्षांच्या आत ‘ममाअर्थ’ची मूळ कंपनी होनासा कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड ही युनिकॉर्न बनली. भारतात टॉक्सिन फ्री बेबी प्रॉडक्ट्स उपलब्ध असते, तर कदाचित ‘ममाअर्थ’सारख्या ब्रॅण्डचा पाया रचला गेला नसता. ‘मामाअर्थ’च्या सह-संस्थापक गझल अलघ यांचा मुलगा अगस्त्यला जन्मापासूनच त्वचेसंबंधित त्रास होत होता. टॉक्सिन असलेले कोणतेही उत्पादन त्याला चालत नव्हते. भारतात टॉक्सिन फ्री प्रॉडक्ट्स उपलब्ध नसल्यामुळे गझल व वरुण या दाम्पत्याला परदेशात जाणाऱ्या त्यांच्या मित्रांकडून टॉक्सिन फ्री प्रॉडक्ट्स घ्यावी लागली. अनेक पालक या समस्येशी झगडत असल्याचे गझल यांच्या लक्षात आले. येथूनच गझल यांना ‘मामाअर्थ’ सुरू करण्याची कल्पना सुचली. गझल यांनी आपले पती वरुण यांच्यासोबत २०१६ मध्ये होनासा कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड नावाची स्टार्टअप कंपनी सुरू केली आणि ममाअर्थ या ब्रॅण्ड नावाने बाजारात प्रॉडक्ट लाँच केले.

३५ व्या वर्षी बनली अब्जाधीश

मामाअर्थ आज एक मोठा ब्रॅण्ड बनला आहे. गझल आणि वरुण यांची ही कंपनी आता बाजारात बेबी केअर, स्किन केअर आणि ब्युटी सेगमेंटमध्ये अनेक उत्पादनांची विक्री करते. ‘मामाअर्थ’व्यतिरिक्त, द डर्मा को आणि बीब्लंट हेदेखील होनासाचे ब्रॅण्ड आहेत. गझल अलग यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये कंपनीच्या महसुलात ५८.३ टक्के वाढ झाली असून, होनासा कन्झ्युमरचा महसूल आता १००० कोटी रुपयांच्या वर गेला आहे.

हेही वाचा >> Gold-Silver Price on 16 December 2023: सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? मग जाणून घ्या आजचे दर

तुम्ही सुरुवात तर करा

एखादी गोष्ट स्वत: केल्याशिवाय कळत नाही किंवा वरवर कितीही ज्ञान असले तरी जोपर्यंत स्वत: त्यात उतरत नाही तोपर्यंत काही गोष्टी कळत नाहीत. यावरून गझल अलघ सांगतात की, उद्योजकीय प्रवासातून एक गोष्ट शिकले आणि ती म्हणजे पहिल्या दिवशी सर्व काही कळणार नाही. “तुम्हाला फक्त सुरुवात करून, गोष्टी शोधून काढाव्या लागतील.”