मुंबई : नेस्ले कंपनीने विकसनशील देशांमध्ये लहान मुलांसाठीच्या दुग्धजन्य पदार्थांत साखर जास्त वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. याचा फटका नेस्ले इंडिया कंपनीला गुरुवारी भांडवली बाजारात बसला. कंपनीच्या समभागात घसरण झाल्याने तिचे बाजार भांडवल ८ हजार १३७ कोटी रुपयांनी कमी झाले.

हेही वाचा >>> गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई शेअर बाजारात नेस्ले इंडियाच्या समभागात आज ३.३१ टक्क्यांनी घसरण होऊन तो २ हजार ४६२ रुपयांवर बंद झाला. बाजारात नेस्लेच्या समभागात आज सर्वाधिक घसरण नोंदविण्यात आली. याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचा समभाग २.९४ टक्क्यांनी घसरून २ हजार ४७१ रुपयांवर बंद झाला. कंपनीचा समभाग गडगडल्याने तिचे बाजार भांडवल ८ हजार १३७ कोटी रुपयांनी कमी होऊन २ लाख ३७ हजार ४४७ कोटी रुपयांवर आले. नेस्ले कंपनीने विकसनशील देशामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असलेली उत्पादने विकल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमधील पब्लिक आय स्वयंसेवी संस्था आणि इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क यांनी हा दावा केला आहे. नेस्ले इंडियाने या प्रकरणी भूमिका जाहीर केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, भारतात गेल्या पाच वर्षांत लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये अतिरिक्त साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आले आहे.