पुणे/मुंबई: देशातील आघाडीची सराफी पेढी असलेल्या पीएनजी ज्वेलर्स भव्य दिवाळी मोहिमेची आनंदात सुरुवात करणार आहे. ही मोहीम २२ सप्टेंबरपासून सुरू झाली असून २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणार असून, ग्राहकांना आकर्षक दरांमध्ये अप्रतिम दागिने खरेदी करण्यासाठी एक अविस्मरणीय संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या दिवाळी मोहिमेअंतर्गत, ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्के सवलत जाहीर केली आहे. तसेच जुन्या सोन्याच्या एक्स्चेंजवर शून्य टक्के घट मिळणार आहे. या ऑफर्स ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या सर्व शोरूममध्ये तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असणार असून ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार उत्तम दर्जाचे दागिने खरेदी करता येणार आहेत.
या मोहिमेबाबत बोलताना, ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “दिवाळी हा प्रकाश, समृद्धी आणि एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे. आमच्या ग्राहकांनी पिढ्यानपिढ्या पीएनजी ज्वेलर्सवर दाखवलेल्या विश्वासामुळे हा सण आमच्यासाठी विशेष आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सवलतींचा लाभ घेता येईल व हा सण अधिक आनंदाने साजरा करता येईल. परंपरा, विश्वास आणि किफायतशीरपणा यांचा संगम अनुभवण्यासाठी आम्ही ग्राहकांना या मोहिमेचा लाभ देण्यासाठी उत्सुक आहोत.”
दिवाळी हा भारतात दागिने खरेदीसाठी सर्वात शुभ काळ मानला जातो. या मोहिमेद्वारे, पीएनजी ज्वेलर्स विश्वास, शुद्धता आणि दागिन्यांच्या अद्वितीय कारागिरीच्या माध्यमातून आपली ओळख अधिक बळकट करत आहे. या सणासुदीत ग्राहकांना पारंपरिक कलेसह आधुनिक डिझाइन्सचा संगम असलेले सोने आणि हिऱ्याचे आकर्षक दागिने पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. या मोहिमेद्वारे ‘पीएनजी ज्वेलर्स’ प्रत्येक सण अधिक खास बनवण्याच्या वचनबद्धतेची जाणीव करून देत आहे. यातून परंपरेची श्रीमंती आणि आधुनिकतेची झलक एकत्र आणणारे दागिने ग्राहकांसाठी सादर केले जातील, असेही ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले.