पुणे : पोको कंपनीने एफ-सिरीजमधील नवीन स्मार्टफोन ‘पोको एफ७’ सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये उच्च कार्यक्षमता आणि जास्त क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे,
याबाबत पोको इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन म्हणाले की, ‘पोको एफ७’ मध्ये ७५५० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ही देशातील या श्रेणीतील मोबाईलमध्ये सर्वात जास्त क्षमतेची बॅटरी आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये सुधारित ऊर्जा घनता आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी सिलिकॉन कार्बन इनोव्हेशनचा वापर करण्यात आला आहे. या बॅटरीला ९० वॉट टर्बो चार्जिंग आणि २२.५ वॉट रिव्हर्स चार्जिंग क्षमता आहे. यामधून ग्राहकांना दिवसभर आणि त्यापेक्षा अधिक काळ स्मार्टफोन वापरू शकतात. या स्मार्टफोनची जाडी ७.९९ मिमी आहे. त्यामुळे हा मोठी बॅटरी असलेला भारतातील सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन आहे.
मोठी बॅटरी किंवा फास्ट चार्जिंग पुरेसे नाही तर ग्राहकांना उच्च कार्यक्षमता, आकर्षक डिझाइन, टिकाऊपणा आणि सर्वोत्तम व्हिज्युअल्सचा अनुभव देणे महत्त्वाचे आहे. या स्मार्टफोनमधील स्नॅपड्रॅगन ८एस जेन ४ चिपसेट आहे.
एलपीडीडीआर ५ एक्स मेमरी, यूएफएस ४.१ स्टोरेज आणि जवळपास २४ जीबी (१२ जीबी १२ जीबी) टर्बो रॅम अशी या स्मार्टफोनची वैशिष्टे आहेत. या स्मार्टफोनमध्ये ६.८६ इंच १.५के एएमओएलईडी डिस्प्लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि अत्यंत अरूंद बेझल्स आहेत. गेमिंग, कन्टेन्ट स्ट्रिमिंग हा स्मार्टफोन चांगला पर्याय ठरेल, असेही टंडन यांनी स्पष्ट केले.