मुंबईः रिलायन्स रिटेलचे अंग असलेल्या जिओमार्ट त्याच्या सध्या अस्तित्व नसलेल्या क्षेत्रांमध्ये त्याचे वितरण जाळे मजबूत करण्यासाठी ‘डार्क स्टोअर’ विभागात प्रवेशाचा विचार करत असून, लवकर द्रुत व्यापारावर (क्यू-कॉमर्स) लक्ष केंद्रित करण्याचे कंपनीने सूचित केले.

कपड्यांपासून ते सौंदर्य आणि जीवनशैलीच्या वस्तूंपर्यंत उत्पादनांच्या विक्रीत असलेल्या जिओमार्टचा एक अंतर्गत संघ डार्क स्टोअर्सच्या प्रांगणात प्रवेशासाठी पर्यायांचे मूल्यांकन करत आहोत, असे ‘फिजिटल रिटेल कन्व्हेन्शन’च्या निमित्ताने एक चर्चेत जिओमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वरगंटी यांनी सांगितले. किराणा दुकानांद्वारे व्यवसायाची उपस्थिती १,००० शहरांमध्ये असली तरी, काही क्षेत्रे अजूनही वंचित आहेत. त्यामुळे जिओमार्ट नफ्यावर लक्ष केंद्रित करून स्वतःची द्रुत व्यापार सेवा देखील सक्रियपणे विकसित करू पाहात आहे. डार्क स्टोअरसारख्या महागड्या पायाभूत सुविधांमुळे हे द्रुत व्यापार अजूनही तोट्यात आहे. तथापि हा मार्ग निश्चितपणे अनुसरताना, आम्ही हा व्यवसाय फायदेशीर देखील करून दाखविणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारताच्या क्यू-कॉमर्स क्षेत्रात Blinkit, Swiggy Instamart, Zepto आणि Flipkart यांसारख्या मोठ्या ब्रँड्सनी मोठी गुंतवणूक केली असली, तरी ‘डार्क स्टोअर्स’ आणि वितरणासाठी लागणाऱ्या महागड्या पायाभूत सुविधांमुळे हे मॉडेल अजूनही तोट्यात आहे.