पुणे : भारतीय सॅनिटरीवेअरची बाजारपेठ ही दोन अब्ज डॉलरची असून ती झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती कोहलरचे दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित ओक यांनी दिली. तसेच, आर्थिक समृद्धी आणि परदेशी प्रवासातून जागतिक प्रवाहांचा परिचय वाढल्याने आलिशान बाथरूम उत्पादनांची मागणी पुण्यात वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोहलरने नुकताच देशातील तिसरा ‘स्टुडिओ कोहलर’ पुण्यातील कोरेगाव पार्क येथे सुरू केला आहे. हे अत्याधुनिक अनुभूती केंद्र वास्तुविशारद, डिझाइनर आणि ग्राहकांना आलिशान बाथरूम नवकल्पनांचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ओक म्हणाले की, करोना संकटाच्या काळात लोक घरात जास्त वेळ घालवत होते. त्या काळात अनेकांनी आपल्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक केली. घराचे आणि त्यातील सुविधांचे स्वरूप व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत ठेवण्याकडे लोकांचा कल आहे. यामुळे प्रीमियम व आलिशान बाथरूम उत्पादनांची मागणी वाढत आहे.
पुणेकरांसाठी बाथरूम उत्पादनांमध्ये तंत्रज्ञान आणि आराम यांची सांगड महत्त्वाची ठरते. याच अनुषंगाने वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रातील पाण्याच्या दाबातील फरक लक्षात घेऊन कोहलरने ‘वॉटरमाइंड’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे पाण्याच्या दाब कमी-जास्त असला तरी उत्पादनांतून मिळणारा परिणाम सारखाच असेल. मुंबई, पुण्यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरसारख्या शहरांमध्येही प्रीमियम व आलिशान सॅनिटरीवेअरची मागणी वाढत आहे, असे ओक यांनी सांगितले.
मोठ्या महानगरांत पाणी टंचाईची समस्या वाढत आहे. आमच्या एका उत्पादनाच्या वापरामुळे वार्षिक १२ हजार लिटरपर्यंत पाणी बचत करता येते. गेल्या वर्षी कोहलरच्या उत्पादनांमुळे तब्बल ३० कोटी लिटरहून अधिक पाणी बचत झाली. – रणजीत ओक, व्यवस्थापकीय संचालक, कोहलर (दक्षिण आशिया)