मुंबई : गुरुवारी जाहीर होणारे रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आणि अमेरिकेतील महागाई दराची आकडेवारी या दोन महत्त्वाच्या घटनांपूर्वी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा कायम आहे. मात्र बुधवारी शेवटच्या तासाभरात निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि महिंद्र अँड महिंद्र या समभागातील खरेदीच्या परिणामी बाजाराचा मूड पालटला आणि सेन्सेक्स-निफ्टी सकारात्मक पातळीवर विसावले.

हेही वाचा >>> HDFC बँकेने MCLR दरात केली वाढ, आता ग्राहकांचा EMI महागणार

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४९.३१ अंशांनी वधारून ६५,९९५.८१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४०२.१२ अंशांनी घसरणीसह ६५,४४४.३८ हा तळ गाठला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६१.७० अंशांची भर पडली आणि तो १९,६३२.५५ पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा >>> मुकेश अंबानींनी घर विकले, जाणून घ्या किती किंमत मिळाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युरोपीय बाजारातील तेजी आणि देशांतर्गत आघाडीवर धातू, तेल-वायू आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांतील खरेदी जोर वाढल्यामुळे सलग दोन सत्रांतील घसरणीनंतर बुधवारच्या सत्रात बाजार सावरला. दुसरीकडे पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने अमेरिकेच्या सहा प्रमुख बँकांचे मानांकन कमी करण्याचा इशारा दिल्याने आणि चिनी निर्यातीत घसरण झाल्याने जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण कायम आहे, असे मत कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे संशोधनप्रमुख (किरकोळ) श्रीकांत चौहान यांनी व्यक्त केले.

सर्वाधिक वधारले

जेएसडब्ल्यू स्टील २.६८ टक्के,

टाटा मोटर्स,

महिंद्र अँड महिंद्र,

टाटा स्टील,

टेक महिंद्रा,

रिलायन्स इंडस्ट्रीज

सर्वाधिक घसरले

बजाज फायनान्स

मारुती

आयसीआयसीआय बँक

पॉवर ग्रिड

एशियन पेंट्स

ॲक्सिस बँक

बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ६५,९९५.८१ १४९.३१ (०.२३ टक्के)

निफ्टी १९,६३२.५५ ६१.७० (०.३२ टक्के)

डॉलर ८२.८६ -५ तेल ८६.८५ ०.७९