मुंबई : विदा साठवण क्षमतेसाठी सातत्याने मागणी वाढत असून, इंटरनेटचा वापरही वेगाने वाढत असल्याने पुढील तीन वर्षांत डेटा सेंटर क्षेत्र १० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करतील, असा अंदाज ‘सीआयआय-कोलायर्स’च्या अहवालात गुरुवारी वर्तविण्यात आला.

उद्योगांची राष्ट्रीय संघटना ‘सीआयआय’ आणि बांधकाम क्षेत्रातील ‘कोलायर्स इंडिया’ यांनी देशातील डेटा सेंटरच्या वाढीबाबतचा अहवाल गुरूवारी जाहीर केला. या अहवालानुसार, देशातील डेटा सेंटर बाजारपेठेने करोना संकटानंतर २०२० पासून ७ अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित केली आहे. जागतिक पातळीवरील डेंटा सेंटर चालक, बांधकाम विकसक आणि प्रायव्हेट इक्विटी फंडांकडून ही गुंतवणूक झालेली आहे. यंदा ऑगस्टपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या प्रमुख महानगरांतील डेटा सेंटरची क्षमता ८१९ मेगावॉटपर्यंत पोहोचली असून, त्यांचा विस्तार १.१ कोटी चौरस फुटापर्यंत झाला आहे.

हेही वाचा… पेटीएम पेमेंट्स बँकेला ५.३९ कोटींचा दंड; पुण्यातील अण्णासाहेब मगर बँकेवरही कारवाई

डेंटा सेंटरचा विस्तार २०२६ पर्यंत २.३ कोटी चौरस फुटांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच, २०२३-२६ या कालावधीत एकूण डेटा सेंटर पुरवठ्यात मुंबईचा वाटा निम्मा असेल. पुढील तीन वर्षांत डेटा सेंटर १० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करतील. सरकारकडून इंटरनेटचा प्रसार वाढविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, डिजिटलायजेशनची मोहीम, क्लाउड कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ५ जी यांचा अधिकाधिक स्वीकार यामुळे ही गुंतवणूक वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा… ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे आज वितरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष

जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि विकसक हे डेटा सेंटर चालकांशी भागीदारी करीत आहेत. त्यातून डेटा सेंटर चालकांचे कार्यकौशल्य आणि बाजारपेठेचा अनुभव डेटा सेंटर विकासासाठी उपयुक्त ठरत आहे. जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार हे विस्तार करण्यासाठी भारताकडे प्रमुख बाजारपेठ म्हणून पाहात आहेत, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.