Veg Thali Cost: ऑगस्ट आणि जुलै महिन्यात जेवणाच्या थाळीच्या सरासरी दरात मोठी वाढ झाली होती आणि त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे टोमॅटोच्या दरात झालेली वाढ होती. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात एका थाळीच्या सरासरी किमतीत १७ टक्क्यांची लक्षणीय घट दिसून आली आहे. ही १७ टक्के घट शाकाहारी थाळीच्या किमतीत दिसली असून, टोमॅटोचे भाव सामान्य पातळीवर आल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे.

मांसाहारी थाळीचे दरही झाले स्वस्त

तर मांसाहारी थाळीच्या किमतीत सरासरी ९ टक्क्यांनी घट झाली आहे. CRISIL च्या मासिक फूड प्लेट कॉस्ट इंडिकेटरमध्ये हे उघड झाले आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात १२ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली असून, येत्या काही महिन्यांतही हे दर मजबूत राहतील, असा अंदाज आहे. खरीप २०२३ मध्ये पिकांचे उत्पादन कमी झाले आहे, त्यामुळे कांद्याचे भाव चढे राहू शकतात.

हेही वाचाः Money Mantra : युनिकॉर्न व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे स्टार्टअप, जाणून घ्या ‘हेक्टोकॉर्न’ म्हणजे काय?

चिकनचे दर वाढलेत

सप्टेंबरमध्ये महिन्यानुसार मांसाहारी थाळीत ९ टक्के घट झाली आहे. परंतु गेल्या महिन्यापासून ब्रॉयलर चिकनचे दर २-३ टक्क्यांनी वाढले आहेत आणि मांसाहारी थाळीच्या एकूण किमतीच्या त्यांचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हेही वाचाः Money Mantra : बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या रोख रकमेवर किती फायदा मिळतो? RBI चे नियम काय? जाणून घ्या

जेवणाच्या खर्चावर परिणाम करणारे इतर खर्च जाणून घ्या

शाकाहारी थाळीत १४ टक्के आणि मांसाहारी थाळीत ८ टक्के वाटा असलेल्या इंधनाच्या किमती सप्टेंबरमध्ये १८ टक्क्यांनी कपात झाली आहे. सप्टेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपयांवरून ९०३ रुपयांवर आली असून, त्याचा परिणाम जेवणाच्या ताटाच्या किमतीवर दिसून येत आहे. या महिन्यात हिरवी मिरचीचे भावही ३१ टक्क्यांनी कमी झाले असून, त्यामुळे जेवणाची थाळी स्वस्त होण्यास मदत झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारे थाळीचे दर ठरवले जातात

देशातील सर्व प्रदेशातील खाद्यपदार्थांच्या किमतीच्या आधारे CRISIL जेवणाच्या प्लेटची सरासरी किंमत मोजते. त्यामुळे लोकांच्या जेवणाचा खर्च शोधणे सोपे होते. धान्य, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल, ब्रॉयलर चिकन आणि स्वयंपाकाच्या गॅसमुळे थाळीच्या किमतीत बदल दिसून येत आहेत.

महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

  • क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स आणि अॅनालिटिक्सच्या फूड प्लेट कॉस्टच्या मासिक निर्देशकामध्ये रोटी चावल रेट (RRR) नुसार, सप्टेंबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमती कमी झाल्या आहेत.
  • सप्टेंबरमध्ये टोमॅटोचा दर महिन्याला ६२ टक्क्यांनी घसरून ३९ रुपये किलो झाला आहे. टोमॅटोचा भाव ऑगस्टमध्ये १०२ रुपये किलो होता.
  • व्हेज आणि नॉन व्हेज थाळीच्या किमती घसरण्यामागचे मुख्य कारण म्हणजे टोमॅटोच्या किमतीत झालेली घसरण आहे.
  • अहवालानुसार, वार्षिक आधारावर सप्टेंबरमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत एक टक्का घसरण झाली आहे.
  • गहू आणि पाम तेलाच्या चढ्या किमतींमुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत ०.६५ टक्क्यांनी किंचित वाढ झाली आहे.