नवी दिल्ली : झी एंटरटेन्मेंट आणि इंडसइंड बँक यांच्यात बुडीत कर्जावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. दोन्ही पक्षांत समझोता झाल्याची माहिती राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) बुधवारी दिली. यामुळे सोनी आणि झी या मनोरंजन उद्योगातील महाविलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अदाणी समूहाने ‘इतके’ अब्ज डॉलरचे शेअर्स तारण ठेवून केली कर्जाची परतफेड, पण आता…

झी एंटरटेन्मेंटचे प्रवर्तक सुभाष चंद्रा यांच्या मालकीच्या कंपनीने ८३.०३ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा दावा इंडसइंड बँकेने केला होता. त्यामुळे झीच्या दिवाळखोरीसाठी बँकेने फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला. परिणामी सोनी आणि झी यांच्या विलीनीकरणाची प्रक्रियेतही अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे झीने त्याविरोधात ‘एनसीएलएटी’कडे अपील दाखल केले. आता इंडसइंड बँकेनेच समझोत्यासाठी पाऊल टाकल्याने, डिसेंबर २०२१ मध्ये विलीनीकरणाच्या कराराच्या मार्गातील अडचणही दूर झाली आहे.

हेही वाचा >>> Gold Rate Today : सोने ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा भाव

दोन्ही कंपन्यांनी सामंजस्याला संमती दर्शवली आहे. या मान्यतेमुळे झी एंटरटेन्मेंटला कोणताही दंड भरावा लागणार नाही आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होणार नाही, असे झी एंटरटेन्मेंटने बुधवारी भांडवली बाजाराला अधिकृतरीत्या माहिती दिली. झी आणि इंडसइंड बँक यांच्यात परस्पर सहमतीने वादावर तोडगा निघण्यासह, सोनीमध्ये झी एंटरटेन्मेंटच्या विलीनीकरणाचा मार्ग सुकर झाल्याने भांडवली बाजारात झीच्या समभागात बुधवारी वाढ दिसून आली. समभाग ३.४७ टक्के वाढीसह, २१६.०५ रुपये असा एका आठवड्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee entertainment and indusind bank settle loan default dispute zws
First published on: 30-03-2023 at 10:06 IST