Credit Card : क्रेडिट कार्ड हे आजकाल तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झालं आहे. अनेक नोकरदार वर्गातले लोक, तसंच व्यवसाय करणारे लोक क्रेडिट कार्ड वापरतात. अनेक बँका अगदी किफायतशीर दरांमध्ये क्रेडिट कार्डची सेवा पुरवतात. डेबिट कार्डप्रमाणेच क्रेडिट कार्ड हे बहुतांश लोकांच्या आयुष्याचा व्यवहार्य आयुष्याचा भाग झालं आहे. डेबिट कार्ड हरवल्यास ब्लॉक करुन नव्याने मागवण्यासाठी अर्ज करावा लागतो. पण क्रेडिट कार्ड हरवल्यास काय करायचं? त्याचा गैरवापर टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घेऊ.
क्रेडिट कार्ड हरवल्यास काय करायचं?
१) सर्वात आधी ज्या बँकेचं क्रेडिट कार्ड हरवलं आहे त्या बँकेला तातडीने कळवा की क्रेडिट कार्ड हरवलं आहे. कस्टमर केअर नंबरवर फोन करा आणि ही माहिती द्या. क्रेडिट कार्ड तातडीने ब्लॉक करा.
२) तातडीने मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करा आणि क्रेडिट कार्ड त्यावरुन ब्लॉक करा. यामध्ये सगळी माहिती भरुन तुमचं क्रेडिट कार्ड तुम्हाला ब्लॉक करता येईलल.
३) बँकेला फोन करुन किंवा फोन अथवा इंटरनेट बँकिंगचा वापर करुन तुमच्या क्रेडिट कार्डवरुन होणारे सगळे व्यवहार तातडीने बंद करा. असं झाल्यास तुमच्या कार्डचा गैरवापर कुणीही करु शकणार नाही. अनेक बँका तात्पुरत्या स्वरुपात कार्ड ब्लॉक करण्याचा पर्यायही देतात. तसंही करता येऊ शकतं.
४) तुम्ही तातडीने तुमचं स्टेटमेंट तपासा, तुमच्या क्रेडिट कार्डवरुन तुमच्याशिवाय इतर कुणी कुठले व्यवहार केलेले नाहीत ना? हे तुम्हाला समजू शकणार आहे. त्यानंतर बँकेच्या इमेल आयडीवर तातडीने क्रेडिट कार्ड हरवल्याची माहिती द्या.
५) तुम्हाला जर लक्षात आलं की क्रेडिट कार्डाचा गैरवापर झाला आहे तर तातडीने पोलीस तक्रार करा आणि या प्रकरणी गुन्हा नोंदवा. तुमच्या घराजवळ असलेल्या पोलीस ठाण्यात तुम्ही क्रेडिट कार्ड हरवल्यासंबंधीचा गुन्हा नोंद करु शकता.
६) तुमचं क्रेडिट कार्ड जर तुम्ही ब्लॉक केलं असेल तर तुम्हाला जवळच्या बँकेच्या शाखेत पर्यायी कार्डासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठीचं शुल्क तुमच्या बँक खात्यातून घेतलं जाईल.
७) तुमच्या कार्डावरचे डिटेल्स, सीसीव्ही, एक्सापारी डेट हे सगळे तपशील नवं कार्ड आल्यानंतर बदला. आर्थिक व्यवहार इतर कुणालाही करता येणार नाहीत याची काळजी घ्या. अशा पद्धतीने कार्ड हरवल्यानंतर तुम्हाला सात महत्त्वाच्या गोष्टी करता येतील. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टी हरवल्यानंतर तुम्हाला वरच्या बाबींचा तातडीने उपयोग करुन तुमचं क्रेडिट कार्ड ब्लॉक करता येणार आहे. डेबिट कार्ड ब्लॉक केल्यास ज्याप्रमाणे कुणाला ते वापरुन पैसे काढता येणार नाहीत अगदी त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड हरवल्यास तुमच्या कार्डाचा गैरवापर होऊ नये म्हणून या सात महत्त्वाच्या टिप्स तातडीने करण्यासंबंधीची पावलं उचला. जेणेकरुन तुमच्या क्रेडिट कार्ड आणि बँक अकाऊंटवरुन काहीही गैरव्यवहार केले जाणार नाहीत किंवा कार्डचा दुरुपयोग होणार नाही.