बुधवारी अदाणी समूहाच्या शेअर्सचा वेग थोडा कमी दिसत असला तरी मंगळवारी समूह कंपन्यांच्या शेअर्सचा वेग सुस्साट होता. BSE कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये २ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे समूह कंपन्यांचे बाजारमूल्य ५० हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. सध्या समूहाचे बाजारमूल्य १०.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास अदाणी ग्रीनच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर अदाणी पॉवरच्या शेअर्समध्ये ९.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. एसीसी, अदाणी टोटल गॅस, अंबुजा सिमेंट्स, अदाणी विल्मार आणि एनडीटीव्हीचे शेअर्स ४-५ टक्क्यांनी वाढले आहेत. कर्ज कमी करण्यासाठी गौतम अदाणी यांचा समूह विविध कंपन्यांमधील हिस्सा विकत आहे.

हेही वाचाः Money Mantra : निवृत्तीला फक्त २५ वर्षे बाकी, १० हजारांच्या गुंतवणुकीत ७५ हजारांची पेन्शन मिळवा

त्यामुळे कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. त्यानंतरही २४ जानेवारी २०२३ नंतर समूह कंपन्यांचे समभाग १ टक्क्यांवरून ८३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आहे, ज्यामध्ये अदाणी यांच्यावर सर्वात मोठ्या अकाऊंटिंग फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचाः Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची! भारतातील विक्रीमध्ये मिळालेला दीर्घकालीन नफा विदेशात गुंतवून फायदा मिळतो का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंबंधी भूमिकेची प्रतीक्षा गुंतवणूकदार करत असल्याने त्याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारांवर उमटले. देशांतर्गत भांडवली बाजारात तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारी दिवसअखेर नकारात्मक पातळीवर स्थिरावला होता.दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९.०७ अंशांनी घसरून ६६,३५५.७१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने ६६,५५९.२९ ही उच्चांकी तर ६६.१७७.७२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मात्र ८.२५ अंशांनी वधारला आणि १९,६८०.६० या सकारात्मक पातळीवर बंद झाला होता.