– मनीष गोएल

ध्येयावर आधारित गुंतवणूक करण्याचा दृष्टिकोन म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी खूपच सुयोग्य ठरला आहे; पण थेट इक्विटी अर्थात समभागसंलग्न गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही तो योग्य ठरतो का? यासाठी गुंतवणूकदाराला ध्येयाचा प्रकार आणि तो साध्य करण्यासाठी आवश्यक रक्कम निश्चित करावी लागते. एकदा हे निश्चित केले की, चक्रवाढीचे बळ आणि कालावधी विचारात घेऊन गुंतवणुकीच्या रकमेचा अंदाज गुंतवणूकदाराला करता येतो.

ध्येयनिश्चिती करणे : हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू. राहुलचे वय २८ वर्षे आहे आणि त्याला खालील ध्येये साध्य करायची आहेत :

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

१. तीन वर्षांत सेकंडहँड हॅचबॅक कार घ्यायची आहे.

२. घरातील लग्नकार्यासाठी पाच वर्षांत रक्कम जमा करायची आहे.

३. वयाच्या ४० व्या वर्षी त्याला जे घर घ्यायचे आहे, त्याच्या डाऊन पेमेंटसाठी रक्कम जमा करणे.

४. मुलाच्या उच्चशिक्षणासाठी म्हणजेच २७ वर्षांनंतर वापरात येईल अशी धनराशी (कॉर्पस) तयार करणे.

५. वयाच्या ६०व्या वर्षी निवृत्ती व त्यापश्चात जीवनासाठी निधी जमवणे.

भविष्यातील विविध ध्येये साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम गृहीत धरून खालील तक्ता तयार केला आहे.

 investment

* महागाई लक्षात घेत निश्चित केलेली अंदाजित रक्कम

राहुलच्या उत्पन्नात वर्षागणिक वाढ होत जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्याजोगी रक्कमही दरवर्षी वाढणार आहे. म्हणून, तो त्याच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर विविध प्रकारच्या ध्येयांसाठी गुंतवणूक करू शकेल. राहुलला ३ वर्षांनी सेकंड हँड हॅचबॅक घ्यायची असल्याने ‘इक्विटी’ हा त्याच्यासाठी योग्य ॲसेट क्लास (मालमत्ता वर्ग) नाही. इतर ध्येये मात्र मध्यम ते दीर्घकालीन आहेत. इक्विटीमध्ये गुंतवणूक करून राहुल ही ध्येये साध्य करू शकतो. खाली दिलेला तक्ता पाहा.

 investment

हे आकडे कदाचित अविश्वसनीय वाटू शकतात; पण निफ्टीने गेल्या २० आणि १० वर्षांत (आर्थिक वर्ष २०२२ च्या अखेरपर्यंत) अनुक्रमे सुमारे १५ टक्के आणि १३ टक्के वार्षिक सरासरी दराने (सीएजीआर) परताव्याची कामगिरी केली आहे, तर बहुतेक म्युच्युअल फंडांनी निफ्टीला ५ ते ७ टक्क्यांच्या ‘अल्फा’ने (गुंतवणुकीवर मिळणारा अतिरिक्त परतावा) पिछाडीवर टाकले आहे. म्हणजे याच कालावधीत निफ्टीच्या परताव्यापेक्षा पाच ते सात टक्के अधिक अर्थात २० ते २२ टक्के परतावा दिला आहे. विश्वासार्ह गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार १० टक्के किंवा त्याहून अधिक ‘अल्फा’ निश्चितच साध्य करू शकतो.

हेही वाचा – पोर्टफोलियोसाठी शेअर्स निवडताना : कंपनीवरील कर्जभार दखलपात्रच !

मालमत्ता वर्गांचा विचार करता इक्विटीची कामगिरी कशी असते?

या कामगिरीला खालील तक्त्याचे विश्लेषण करून पाहता येईल

 investment

मध्यम आणि दीर्घ कालावधीचा विचार करता इक्विटीमध्ये इतर सर्व मालमत्ता वर्गांपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे हे स्पष्ट आहे. अल्पकालीन ध्येये साध्य करण्यासाठी गुंतवणूकदार तुलनेने कमी अस्थिर मालमत्ता वर्गांवर लक्ष द्यावे. म्हणून ही ध्येये साध्य करण्यासाठी इक्विटीचा वापर करता येईल.

जोखीम क्षमतेचे मूल्यमापन करणे

इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करावे. अल्पकालीन विचार करता इक्विटी हा अस्थिर मालमत्ता वर्ग आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणूक मूल्यामध्ये होणाऱ्या चढउतारांचा परिणाम सहन करण्याची क्षमता गुंतवणूकदारामध्ये असली पाहिजे. त्याचप्रमाणे लार्ज-कॅप शेअर्सच्या तुलनेने स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप शेअर्स अधिक अस्थिर असतात. म्हणून इक्विटीमध्ये गुंतवणूक करतानासुद्धा पारंपरिक गुंतवणूकदार त्याच्या पोर्टफोलियोमध्ये अधिक प्रमाणात लार्ज कॅप शेअर्स ठेवेल. याविरुद्ध ॲग्रेसिव्ह गुंतवणूकदार आपल्या पोर्टपोलियोमध्ये मिड-कॅप किंवा स्मॉल-कॅपचा हिस्सा जास्त राखेल.

योग्य अपेक्षा निश्चित करणे

जास्त परतावा मिळविण्याच्या अपेक्षेने अनेक गुंतवणूकदार ‘पेनी स्टॉक्स’ची निवड करतात. ‘टिप्स’च्या आधारे गुंतवणूक करतात किंवा कमकुवत पाया असलेल्या, पण लाभदायक संधी असल्याचे भासवणाऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात. या कंपन्यांचा पाया कच्चा असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम होईल आणि त्यांची कामगिरी बाजाराच्या मानदंडापेक्षा कमी असू शकेल.

गेल्या दोन दशकांत निफ्टीने सरासरी वार्षिक सुमारे १५ टक्के दराने परतावा साध्य केला आहे. म्हणजे तुमच्या पोर्टफोलियोतील गुंतवणूक दर चार-पाच वर्षांत दुप्पट होणे अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांनी किमान हे जरी साध्य केले असेल तरी गेल्या २० वर्षांत (२ डिसेंबर २००२ ते २ डिसेंबर २०२२) सुमारे १७ पट परतावा प्राप्त केला असेल. दुसऱ्या शब्दांत, डिसेंबर २००२ मध्ये १० लाख गुंतवले असतील, तर २ डिसेंबर २०२२ पर्यंत त्यांनी १.७ कोटी रुपये इतकी धनराशी जमा केली असेल.

हेही वाचा – बाजारातील माणसं : चार्ल्स हेन्री डाऊ : निर्देशांकाचा जन्मदाता

गुंतवणूकदारांनी कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब करावा?

गुंतवणूकदारांनी ५० टक्के रक्कम एकरकमी गुंतवावी आणि उरलेली रक्कम पुढील सहा-आठ महिन्यांमध्ये विविध हप्त्यांमध्ये गुंतवावी. गुंतवणूकदारांनी २०-२५ शेअर्सचा एक पोर्टफोलियो तयार करावा. विविधीकरण आणि विभाजन करणे महत्त्वाचे आहे. गुंतवणूकदाराने सर्व समभागांमध्ये तीन ते सात टक्क्यांदरम्यान रक्कम गुंतवावी. गुंतवणूकदारांच्या या विभाजन (ॲलोकेशन) टक्केवारीनुसार त्याने कायम ॲव्हरेजिंग करण्याचा विचार करावा. गुंतवणूकदाराने वेळोवेळी पोर्टफोलियो पुनर्संतुलित (प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये असलेली गुंतवणूक आवश्यकतेनुसार कमी-जास्त करणे) करावा. वैयक्तिकरीत्या हे सर्व करणे शक्य नसेल तर गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

ध्येये दृष्टिक्षेपात आल्यावर गुंतवणूकदाराने काय करावे?

महागाईमुळे दर वर्षी खर्चात वाढ होण्याची शक्यता असते. म्हणून गुंतवणूकदाराने ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम निश्चित करताना महागाईच्या दराचा विचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार ध्येयपूर्ती कुठवर आली, याचे गुंतवणूकदाराने नित्य मूल्यमापन करावे.

गुंतवणूकदार त्याच्या ध्येयाच्या समीप आला असेल आणि अपेक्षित परतावा मिळत असेल तर त्याने तो निधी इक्विटीमधून काढून स्थिर-उत्पन्न/ डेट गुंतवणुकीकडे वळवावा; पण परतावा अपेक्षेपेक्षा कमी असेल तर गुंतवणूकदाराने आपले ध्येय थोडेसे पुढे न्यावे किंवा ध्येयाबद्दलची अपेक्षा कमी करावी. पण गुंतवणूकदाराने आपले ध्येय काही वर्षे आधीच साध्य केले किंवा अपेक्षेपेक्षा जास्त धनराशी तयार झाली (गुंतवणूक कालावधीच्या काही महिने आधी) तर ध्येय साध्य करण्यास आवश्यक असलेली रक्कम काढून उरलेली रक्कम गुंतलेलीच ठेवावी.

जसे, घर खरेदी करण्यासाठी १० वर्षांमध्ये ५० लाखांचा निधी तयार करण्याचे गुंतवणूकदाराचे ध्येय होते; पण ध्येयपूर्तीच्या महिन्याला सहा महिने शिल्लक असताना फक्त ४० लाख इतका निधी जमा झाला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराने हे ध्येय साध्य करण्यासाठी अजून २ ते ३ वर्षे प्रतीक्षा केली पाहिजे. तसे करायचे नसेल तर गुंतवणूकदार ४० लाखांमध्ये बसेल अशी घर खरेदीचा पर्याय स्वीकारावा. याउलट गुंतवणूकदाराने ध्येयपूर्तीच्या सहा महिने आधीच ६० लाखांचा निधी गोळा केला, तर गुंतवणूकदाराने त्यातील ५० लाख काढून घ्यावे आणि शिल्लक निधी इक्विटीमध्ये गुंतलेलाच ठेवावा.

सारांशात, एखाद्याने ध्येयाच्या आधारे गुंतवणूक करण्याचे ठरवले, तर इक्विटी हा निश्चितच चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात दीर्घकालीन व नियोजनबद्ध गुंतवणूक केल्याचा फायदा गुंतवणूकदारांनी अनुभवला आहेच. इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना तोच दृष्टिकोन ते ठेवू शकतात.

(लेखक रिसर्च अँड रँकिंगचे संस्थापक व संचालक)