सध्या जगाच्या बाजारात लाखाच्या वर वेगवेगळे निर्देशांक वापरात आहेत; परंतु जगामध्ये जास्तीत जास्त उल्लेख कोणत्या निर्देशांकाचा होत असेल तर तो म्हणजे डाऊ जोन्स ३० या निर्देशांकाचा. त्याचा जो जन्मदाता होता, त्याची आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत.

अमेरिकेत एका छोट्या शहरात कनेक्टिकट येथे चार्ल्स डाऊ याचा जन्म झाला. छोट्यामोठ्या स्वरुपांतले २० व्यवसाय केल्यानंतर त्याला त्याचे खरे प्रेम कशावर आहे ते समजले आणि तो पत्रकारितेच्या क्षेत्रात आला; परंतु त्याचबरोबर अर्धवेळ प्रिंटर म्हणून त्याने ‘स्प्रिंगफिल्ड डेली रिपब्लिकन’ या ठिकाणी १८६९ साली काम करण्यास सुरुवात केली. या वर्तमानपत्राचा संपादक बाउल्स हा अत्यंत हुशार, परंतु अत्यंत कठीण माणूस होता. हा पहिला संपादक असा होता की, तो एखादा वृत्तलेख, बातमी छापण्यासाठी जो मजकूर दिलेला असतो, त्याच्या पहिल्या परिच्छेदात संपूर्ण कथा थोडक्यात आली पाहिजे यासाठी आग्रही असे. बातमी लेखनाचे मूलतत्त्व अर्थात – कोण? काय? केव्हा? कोठे? आणि का? हे सारे पहिल्या परिच्छेदात यावे, हा पायंडा त्यानेच रुजवला. अशा ठिकाणी काम केल्यावर १८७५ ला डाऊ ‘स्प्रिंगफिल्ड’ सोडून ‘प्राॅव्हिडन्स जर्नल्स’ या वर्तमानपत्रात रुजू झाला.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Sensex Hits Record, High, 75 thousands Points, Nifty Touches 22753 Points, sensex nifty high, share market, stock market, finance, finance knowledge, finance article, share market high, stoke markte high, marathi news,
सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान
India, Manufacturing Sector, Surges, 16 Year High, in March, HSBC PMI, production sector, finance, finance knowledge, financial decision,
निर्मिती क्षेत्राचा १६ वर्षांचा उच्चांकी जोम; मार्चचा ‘पीएमआय’ निर्देशांक विक्रमी ५९.१ गुणांवर
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

हेही वाचा – अदाणींच्या ‘या’ कंपनीचा नफा चौपट वाढला; एका झटक्यात झाली मोठी कमाई

काही दिवसांनंतर डाऊला ‘प्राॅव्हिडन्स’ हे फार छोटे शहर वाटू लागले. म्हणून तो न्यूयाॅर्कला गेला. या ठिकाणी त्याला त्याचा वर्तमानपत्रातील जुना मित्र भेटला. त्याचे नाव होते ई.डी. जोन्स. या जोन्सबद्दल असे सांगण्यात येते की, हा उंचपुरा, तांबड्या केसांचा, निळ्या डोळ्यांचा आणि गालावर तीळ असलेला माणूस होता. याला सर्व विषयांत रस होता. लोकांमध्ये मिसळण्याची त्याला आवड होती. डाऊ याचे व्यक्तिमत्त्व नेमके याच्या उलट होते. तो अत्यंत कमी शब्दांत व्यक्त होत असे.

हे दोघेजण न्यूयाॅर्क स्टाॅक एक्स्चेंजजवळ नोकरीस होते. अर्थात शेअर बाजाराची सुरुवात त्या रस्त्यावर नंतर झाली. किर्नन हा न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करायचा आणि शेअर बाजारात कार्यरत असलेले त्याचे अनेक मित्र होते. डाऊ आणि जोन्स या दोघांना अतिशय आनंदाने त्याने नोकरीस घेतले. जोन्सकडे एक अतिशय चांगली कला होती, ती म्हणजे त्याला बातम्यांचा वास यायचा. त्याशिवाय आर्थिक आकडेवारी तो विलक्षण वेगाने वाचून आत्मसात करायचा. हे त्याचे अतिशय वाखाणण्याजोगे कौशल्य होते. तर डाऊ हा न्यूज बुलेटिन तयार करण्यासाठी आपले कौशल्य वापरायचा आणि त्याला रोज विश्लेषणात्मक अहवाल प्रसिद्ध करण्याची इच्छा असायची; परंतु त्याच्या प्रकाशकाला मात्र हे छापण्याची उत्सुकता नसायची.

अशा वेळेस डाऊ, जोन्स आणि एक त्याचा मित्र चार्लस मिलफोर्ड बर्ड स्ट्रेर्सस तिघेजण एकत्र आले आणि त्यांनी ठरविले, आपण स्वत: बातम्यांचे आणि बातमीपत्रांचे वाटप करणे हा व्यवसाय सुरू करायचा. नोव्हेंबर १८८२ मध्ये अत्यंत छोट्या जागेत म्हणजे लाकडी जिन्याच्या खाली, रंग नसलेल्या छोट्या खोलीत त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या शेजारी सोडा वॅाटर विक्रीचे दुकान होते.

हेही वाचा – GoFirst ची वाताहत SpiceJet च्या पथ्यावर? महत्त्वाकांक्षी धोरणाला गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद

वर्ष १८८७ पर्यंत त्याच्या व्यवसायाची एवढी वाढ झाली की, माहिती मिळण्यास खूप उशीर होतो अशा तक्रारी सुरू झाल्या. ती ही गरज पूर्ण करण्यासाठी या तिघांनी इलेक्ट्रॅानिक न्यूज टिकर सुरू केले, ज्याला आता ब्रॅण्ड टेप म्हणतात. ही टिकर्स आजसुद्धा वाॅल स्ट्रीटवर वापरले जाते. त्याअगोदर १८८५ मध्ये डाऊ आणि जोन्स यांनी त्यांचे ‘आफ्टरनून न्यूजलेटर’ – ‘दि वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये रुपांतरित केले. वर्षानुवर्षे त्यांचा आकार बदलला नाही. १३ वर्षे डाऊने या वर्तमानपत्रात कधीही त्याचे संपादकीय थांबवले नाही. १९०२ ला त्याचा मृत्यू झाला. डाऊ हा सटोडिया कधीच नव्हता. त्याला शेअर बाजारातल्या घटनांचे विश्लेषण करून भविष्यात काय घडू शकेल याचा वेध घेणे आवडायचे.

‘डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज’ पहिल्यांदा प्रसिद्ध झाले ती तारीख होती ३ जुलै १८८४. त्या वेळेस त्या निर्देशांकानुसार ९ रेल्वे कंपन्या आणि २ औद्योगिक कंपन्या विचारात घेण्यात आल्या होत्या. १२ वर्षे सतत सुधारणा करून फक्त उद्योग क्षेत्रातील कंपन्या विचारात घेऊन २६ मे १८९६ या दिवशी ‘डाऊ जोन्स’ निर्देशांक प्रसिद्ध झाला. अशा रीतीने डाऊ जोन्स निर्देशांकाचा जन्मदाता म्हणून डाऊचे नाव भांडवल बाजारात अजरामर झाले.