वर्ष १९९४ मध्ये स्थापन झालेली युनिपार्ट्स इंडिया ही अभियांत्रिकी प्रणाली आणि सोल्यूशन्सची भारतीय जागतिक उत्पादक कंपनी आहे. युनिपार्ट्स कृषी, बांधकाम, वनीकरण, खाणकाम आणि ऑफ हायवे मार्केटसाठी प्रणाली आणि घटकांची प्रमुख पुरवठादार कंपनी आहे. कंपनीचे अमेरिका, युरोप आणि भारतामध्ये एकंदर सहा उत्पादन सुविधा प्रकल्प तसेच चार वितरण गोदामे आहेत. कंपनीची उत्पादने जगभरातील २५ देशांमध्ये पोहोचतात. कंपनी ऑफ हायवे व्हेइकल्स (ओएचव्ही) उद्योगासाठी उच्च-गुणवत्तेची सर्वसमावेशक उपाय प्रदान करते. यामध्ये अचूक अभियांत्रिकी केलेल्या उत्पादनांचे संपूर्ण असेंब्ली आणि उत्पादनाची संकल्पना, डिझाइन, प्रोटोटाइपिंग, चाचणी, विकास यापासून सानुकूलित पॅकेजिंग आणि वितरणापर्यंतचे सर्व उपाय समाविष्ट आहेत.

युनिपार्ट्सच्या उत्पादन श्रेणीमध्ये ३-पॉइंट लिंकेज सिस्टम (३पीएल) आणि प्रीसीजन मशीन पार्ट (पीएमपी), तसेच पॉवर टेक ऑफ (पीटीओ) फॅब्रिकेशन आणि हायड्रॉलिक सिलिंडरच्या समीप उत्पादनांचा समावेश होतो. जागतिक स्तरावर ३पीएल आणि पीएमपी उत्पादनांच्या निर्मितीमध्ये युनिपार्ट्सची प्रमुख उपस्थिती आहे. कंपनी उत्तर अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका तसेच ऑस्ट्रेलियामधील संघटित किरकोळ विक्रेते आणि वितरकांना ३पीएल भागांची बदली प्रदान करते. प्रमुख युरोपियन ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनीने जर्मनीमध्ये एक गोदाम आणि वितरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. कंपनीच्या ग्राहक वर्गामध्ये जागतिक स्तरावर २५ देशांमध्ये १२५ पेक्षा जास्त नियमित ग्राहकांचा समावेश होतो. यामध्ये बॉबकॅट, टाफे, क्राम्प, यानमार यासारखे नामांकित ग्राहक हे गेल्या दशकभराहून सेवा घेत असून गेल्या काही वर्षांत कंपनीने टीएससी आणि कोब्लेको यांनाही ग्राहक म्हणून जोडले आहे.

आणखी वाचा-मिरे अ‍ॅसेट म्युच्युअल फंडाने आणला मिरे अ‍ॅसेट मल्टीकॅप फंड

मार्च २०२३ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १,३६६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २०५ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे म्हणजेच जूनअखेर सरलेल्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर झालेली नाहीत. यामुळेच गुंतवणुकीचा निर्णय निकाल तपासून करावा. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) करून भांडवली बाजारात पाऊल ठेवले. त्यावेळी प्रवर्तकांनी त्यांचा थोडा हिस्सा प्रतिसमभाग ५७७ रुपयांनी विकला होता. आयपीओला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. मात्र अपेक्षित सूचिबद्धता लाभ न मिळाल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली होती. मात्र सध्या युनिपार्ट्सचा समभाग साधारण ६५० रूपयांच्या पातळीवर उपलब्ध आहे. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून युनिपार्ट्सचा जरूर विचार करावा.

आणखी वाचा-टाटा मोटर्सची मोठी घोषणा, कंपनी DVR शेअर्सचे सामान्य शेअर्समध्ये रूपांतर करणार, तुम्हाला काय फायदा?

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमती पेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्या टप्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड
(बीएसई कोड ५४३६८९)
प्रवर्तक : युनिपार्ट्स समूह
बाजारभाव: रु. ६४९/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: इंजिनिअरिंग /ऑटो अन्सिलरी
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ४४.६२ कोटी
शेअर होल्डिंग