आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी शेअर बाजारात (२९ जानेवारी) प्रचंड वाढ दिसून आली आहे. सेन्सेक्स १२४० अंकांच्या वाढीसह ७१,९४१ वर बंद झाला. निफ्टीमध्येही ३८५ अंकांची वाढ झाली. तो २१,७३७ च्या पातळीवर बंद झाला. या वर्षी शेअर बाजाराचा एकाच दिवसातील हा सर्वात मोठा फायदा आहे. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २५ समभागांमध्ये वाढ आणि केवळ ५ समभागांमध्ये घसरण झाली. आज ONGC चे शेअर्स ८.८९ टक्के आणि Reliance चे शेअर्स ६.८० टक्क्यांनी वाढले. अदाणी एंटरप्रायझेस ५.७९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारादरम्यान रिलायन्सच्या शेअर्सने २९०५ रुपयांची पातळी गाठली. यानंतर त्याचा शेअर थोडा खाली आला आणि १८३.९५ (६.८० टक्के) वाढीसह २८९०.१० वर बंद झाला. या वाढीनंतर कंपनीचे बाजारमूल्य १९.५५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारातील तेजीची ३ कारणे

  • रिलायन्स आणि एचडीएफसी बँक यांसारख्या उच्च वजनाच्या शेअर्समध्ये वाढ
  • जागतिक बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजाराला पाठिंबा मिळत आहे
  • विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक वाढवत आहेत

ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदाणी एंटरप्रायझेस, कोल इंडिया आणि अदाणी पोर्ट्स हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले, तर सिप्ला, आयटीसी, बजाज ऑटो आणि इन्फोसिसचे सर्वाधिक नुकसान झाले. दुसरीकडे आपण इतर क्षेत्रांवर नजर टाकल्यास तर तेल आणि वायू निर्देशांक ५ टक्क्यांनी, पॉवर निर्देशांक ३ टक्क्यांनी आणि भांडवली वस्तू निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला. तसेच बीएसई मिडकॅप निर्देशांक १.७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक एक टक्क्यांनी वाढला.