जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या आठवड्यात तुम्हाला कॉर्पोरेट हालचालींवरदेखील बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. टाटा समूहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स या आठवड्यात एक्स डिव्हिडंडचे व्यवहार करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी टाटाच्या अनेक कंपन्यांनी लाभांश जाहीर केला आहे. लाभांशाच्या रेकॉर्ड डेटच्या आदल्या दिवशीचा हा दिवस असतो.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा केमिकल्स प्री-डिव्हिडंडचा व्यवहार करणार आहेत. जेव्हा एखाद्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सची किंमत लाभांश पेमेंटसाठी निश्चित केली जाते, तेव्हा ती एक्स डिव्हिडंड होते. रेकॉर्ड डेटच्या आधी एक किंवा दोन कामकाजाचे दिवस आहेत. रेकॉर्ड तारखेच्या शेवटी ज्यांची नावे कंपनीच्या यादीत दिसतात, अशा सर्व भागधारकांना लाभांश देय आहे.

हेही वाचाः Cowin पोर्टलवरून डेटा लीक? टेलिग्रामवर करोडो लोकांचा वैयक्तिक तपशील उपलब्ध, केंद्र सरकार चौकशी करणार

कोणत्या कंपनीच्या गुंतवणूकदारांना किती लाभांश मिळणार?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या बोर्डाने ४८ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने १५ जून २०२३ ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. या दिवशी कंपनीचे शेअर्स प्री-डिव्हिडंडवर व्यवहार करतील. गेल्या आर्थिक वर्ष २३ मध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना तीन अंतरिम लाभांश दिला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर ४८ रुपये लाभांश देणार आहे. कंपनीने १३ जून २०२३ (मंगळवार) ही रेकॉर्ड डेट म्हणजेच उद्याची तारीख निश्चित केली आहे. कंपनीच्या शेअरचा आज एक्स डिव्हिडंडवर व्यवहार झाला. कंपनीचे शेअर्स आज २,३५२.०० रुपयांवर बंद झाले. Tata Chemicals ने गुंतवणूकदारांना १७.५ चा अंतिम लाभांश जाहीर केला आहे, यासाठी १५ जून ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली. हे १४ जून २०२३ रोजी एक्स डिव्हिडंडचे व्यवहार करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः तुम्हाला गेल्या वर्षीचा प्राप्तिकर परतावा मिळाला नाही, मग अशा पद्धतीनं तपासा